Bigg Boss Marathi 5 : लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेली कित्येक वर्ष वर्षा उसगावकर या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाबरोबरचं मनमोहक सौंदर्याने व नृत्यविष्काराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ९० च्या दशकात वर्षा उसगांवकर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी आणि राजस्थानी भाषेतही काम केलं आहे. तसंच बॉलीवूड चित्रपटांतही काम करत त्यांनी आपली छाप सोडली आहे. (Bigg Boss Marathi 5 fame Varsha Usgaonkar husband)
अशातच त्यांनी नुकत्याच सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सहभाग घेतला आहे. वर्षा यांनी काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेतून निरोप घेतला होता. तेव्हापासूनच त्या घरात येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. बिग बॉस मराठी ५’ मुळे वर्षा उसगांवकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रवासाबद्दल त्यांनी फक्त त्यांच्या नवऱ्यालाच सांगितलं होतं असं त्यांनी म्हटलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? वर्षा यांचे पती कोण आहेत? ते काय करतात? चला जाणून घ्या…
मार्च २००० मध्ये वर्षा उसगांवकर यांनी अजय शर्मा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. वर्षा उसगांवकरांच्या पतीचे नाव अजय शर्मा असं आहे आणि ते प्रसिद्ध संगीतकार रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. वर्षा व अजय यांच्या लग्नाला २०-२२ वर्षे झाली आहेत. त्यांनी बऱ्याचदा वर्षा यांच्याबरोबर विविध पार्ट्यांना हजेरी लावली आहे. अजय ही सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. सोशल मीडियावर त्यांचे फारचं मोजके फोटो पाहायला मिळतात.
वर्षा नुकत्याच ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्या खेळाचे कौतुक होत आहे. त्यांच्या आधीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘हमाल दे धमाल’, ‘अफलातून’, ‘सवत माझी लाडकी’, ‘गंमत जमंत’, ‘बायको चुकली स्टॅंडवर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. तर हिंदीत त्यांनी ‘साथी’, ‘परदेसी’, ‘घरजमाई’ आदी चित्रपटांत काम केले. तसंच त्यांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली. या मालिकेत त्यांनी साकारलेली माई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.