Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan : बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पाचव्या चांगलीच चर्चा रंगली होती. १०० दिवस चालणारा हा शो ७० दिवसांत हा शो संपला. काल म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी या शोची सांगता झाली आणि रीलस्टार सूरज चव्हाणने यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर, अभिजीत सावंत पाचव्या सीझनचा उपविजेता ठरला. या दोघांनाही संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळालं. यावर्षीच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळाला आणि हा बदल होता होस्टिंगचा… यंदा पहिल्यांदाच रितेश देशमुखने होस्टिंगची धुरा सांभाळली होती आणि यात अभिनेत्याला भरभरून यश मिळालं. रितेशच्या भाऊच्या धक्क्याच्या टीआरपीने यावर्षी उच्चांक गाठला होता. (Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan)
याशिवाय परदेशातील शूटिंगमधून ब्रेक घेत रितेश खास ग्रँड फिनालेसाठी मायदेशी परतला होता. त्यामुळे अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विजेता सूरज व होस्ट रितेश एकमेकांना घट्ट मिठी मारतानाचे पाहायला मिळत आहे. तसंच यावेळी सूरजने होस्ट म्हणून रितेश होता म्हणूनच मी या शोसाठी होका दिला असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच दोघांच्या साधेपणाचेही कौतुक केलं जात आहे.
आणखी वाचा – आनंद शिंदे सूरज चव्हाणसाठी नवं गाणं घेऊन येणार, उत्कर्ष शिंदेची घोषणा, म्हणाला, “त्याच्यावर जळणारे लोक…”
या व्हिडीओत रितेश सूरजला असं म्हणतो की, “तुमचं खूप खूप अभिनंदन, क्या बात है सूरज. मला तुमचा खूप अभिमान आहे. ‘बिग बॉस’ हा माझा पहिलाच शो आणि त्याचे तुम्ही विजेते झालात”. यावर सूरज त्याला असं म्हणतो की, “मला पण खूप भारी वाटत आहे. तुम्ही या पर्वाला आलात म्हणून मी आलो. खरंच… तुम्ही होतात हे कळलं तेव्हा मी होकार दिला. तुम्ही नसते तर मी नसतो आलो. मला कळलं रितेश सर आहेत म्हणून म्हटलं चला. आपला झापूक झुपूक पॅटर्न दाखवू”
दरम्यान, रितेशनेही एक पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “सूरज चव्हाण हा अगदी पात्र विजेता होता, तर अभिजीत सावंतने सर्वांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मराठी होस्ट करणे ही एक मोठी जबाबदारी होती. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि प्रेम हे केवळ अकल्पनीय होते. त्यामुळे मी महाराष्ट्रातील लोकांचे आणि भारतातील सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी नम्रपणे नतमस्तक होतो”.