रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ट्रॉफी त्यांची पण धमाका माझा”, निक्की तांबोळीचा टोमणा नक्की कोणाला?, म्हणाली, “सांगा नक्की कोण जिंकलं?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 7, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi season 5 fame Nikki Tamboli First Tweet

विजेतेपद हुकलेल्या निक्की तांबोळीचं पहिलं ट्विट

Nikki Tamboli First Tweet : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चे हे पर्व विशेष गाजताना पाहायला मिळाले. नुकताच या पर्वाचा महाअंतिम सोहळा अगदी दणक्यात पार पडला. या पर्वाच्या विजेतेपदाचा बहुमान गोलीगत फेम सूरज चव्हाणने पटकावला, तर रनर अप हा अभिजीत सावंत ठरला. टॉप ३ मधील तिसरी स्पर्धक म्हणून निक्की तांबोळीचं नाव समोर आलं. निक्कीने यंदाचं हे पर्व विशेष गाजवलं. यंदाच्या या पर्वात निक्की सर्व स्पर्धकांच्या वरचढ ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

बाईईईईई हा काय प्रकार असे म्हणत निक्कीने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा निक्कीचा पेटंट संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. तसेच निक्की ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाशी वाद घालताना दिसली. ‘बिग बॉस’च्या घरात असा एकही स्पर्धक नाही ज्याच्याशी निक्कीचा वाद झालेला पाहायला मिळाला नाही. “कन्टेंटची महाराणी, queen of एंटरटेनमेंट” अशा अनेक उपमा ‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्कीला मिळाल्या.

आणखी वाचा – Video : शो संपताच रितेश देशमुखला भेटायला गेला सूरज चव्हाण, मिठी मारत तोंडभरुन कौतुक, म्हणाला, “तुमचा अभिमान वाटतो…”

एलिमिनेट होण्यापूर्वी निक्कीला सुद्धा मनात ती एव्हिक्ट होईल याची खात्री होती. निक्की एलिमिनेट झाल्यानंतर आता तिने ट्विटद्वारे शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. निक्कीने ट्विटद्वारे, “ट्रॉफी उनके पास पर दिल और धमाका हमारे नाम का| क्या लगता है कौन जीता?”, असं म्हणत खूप मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. अर्थात टॉप ३ पर्यंत मजल मारत निक्कीचा ट्रॉफीपर्यंतचा प्रवास हुकला. त्यामुळे निक्की नाराज असल्याचं दिसलं. घराबाहेर आल्यावर निक्कीने पहिली पोस्ट शेअर करत तिच्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत.निक्कीने पोस्ट शेअर करत, “हा शेवट नाहीये. ही एका नव्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा”.

आणखी वाचा – Video : फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन्…; अभिजीत सावंतने पुन्हा अनुभवले ‘इंडियन आयडल’चे दिवस, घरी जंगी स्वागत

अनेकांचा केलेला अपमान, अनेकदा घातलेले वाद, प्रत्येक गोष्टीवरुन केलेली भांडण या सगळ्यामुळे निक्कीला महाराष्ट्रातून अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिवाय अरबाज बरोबरच्या तिच्या नात्याची विशेष चर्चा रंगली आणि त्यामुळे ही निक्कीला ट्रोल व्हावं लागलं. मात्र, प्रत्येक ‘बिग बॉस’च्या टास्कमध्ये निक्कीने सगळ्यांच्या वरचढ ठरत ठरत प्रेक्षकांची मन जिंकली. निक्कीचाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Tags: Bigg Boss Marathi Season 5 Grand Finalenikki tamboliNikki Tamboli First Tweet
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan give the reason about speaking less in the house

“घरात काहीच कळत नव्हतं आणि…”, Bigg Boss मध्ये कमी बोलण्यावरुन सूरज चव्हाणचं वक्तव्य, गोंधळला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.