शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सूरज चव्हाणच्या बारामतीमधील गावात राडा, मित्रांचा गुलाल उधळत डीजेवर बेभान होऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 7, 2024 | 11:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 winner suraj chavan Modhave villagers friends celebration and they danced on the DJ.

Bigg Boss Marathi 5 चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणच्या मित्रांचा एकच जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात सूरज चव्हाण बाजी मारणार हे जवळपास निश्चित झालं होतं.  गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे आणि सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Friends Celebration)

सूरज चव्हाण विजयी होताच सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. काही जण सूरज हा सहानूभुतीमुळे जिंकला असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही जण मात्र त्याच्या विजयावर खुश आहेस. सूरज चव्हाण विजयी होताच अनेक कला व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्याच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. तसंच सूरजच्या गावीदेखील मोठ्या जल्लोषात त्याच्या विजयाचा आनंद साजरा केला गेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या ग्रँड फिनालेनंतर अभिजीतच्या वाढदिवसांचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझी ट्रॉफी…”

सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात सूरजच्या मोढवे गावकऱ्यांनी गुलाल उधळत आणि डीजे लावून डान्स केला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा विजेता हा सूरजचं व्हावा अशी इच्छा त्याचे अनेक चाहते करत होते आणि त्याच्या या चाहत्यांची ही इच्छा सूरजने पूर्ण केली आहे. त्यामुळे सूरजच्या समस्त चाहते मंडळी व गावकऱ्यांनी त्याच्या विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला आहे.

आणखी वाचा – “अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही…”, सुप्रिया सूळेंसह इतर राजकीय मंडळींकडून सूरजची वाहवा, म्हणाले, “बारामतीचा रीलस्टार…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे. 

Tags: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj ChavanBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavansuraj chavan Modhave villagers friends celebration
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Grand Finale ankita walavalkar and dhananjay powar

Video : अंकिता वालावलकर व डीपीचं एकत्र सेलिब्रेशन, बाहेर पडताच सेल्फीसाठी गर्दी, म्हणाली, "माझा भाऊ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.