शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“झापुक झुपूक काम आणि…”, सूरज चव्हाणचं आर्याने केलं भरभरुन कौतुक, म्हणाली, “माझ्या भावाने…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan Aarya Jadhao shared special post and expressed his appreciation for him

Bigg Boss Marathi 5 चा विजेता झाल्यानंतर आर्या जाधवने सूरजचे केलं कौतूक, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा सर्वच स्पर्धक गाजले. घरातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र या पर्वातील सर्वात जास्त गाजलेली स्पर्धक म्हणजे आर्या जाधव. निक्कीला मारल्यामुळे आर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. महिन्याभरापूर्वी आर्याने निक्कीच्या कानशिलात मारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भाऊच्या धक्क्यावर तिला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आर्याचे अनेक चाहते व ‘बिग बॉस’चे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. तिला या घरात आणण्याची मागणीही केली गेली. मात्र याला काही प्रतिसाद मिळाला नाही. अशा गाजेलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची अखेर सांगता झाली. (Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan)

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर गोलीगत सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन, राजकीयसह अनेक क्षेत्रांतून सूरजला शुभेच्छा देण्यात आल्या. अशातच आर्यानेही सूरजच्या विजयानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. विजेत्याची घोषणा केल्यावर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं होतं. हाच फोटो आर्याने तिच्या स्टोरीवर रिशेअर करत सूरजचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

“ट्रॉफी जिंकली माझ्या भावाने! एकदम झापुक झुपूक काम केलं आहे भावा!” असं म्हणत आर्याने सूरजच्या विजयाचा आनंद शेअर केला आहे. आर्यासह घराबाहेर आल्यावर अनेक सदस्यांनी सूरज किंवा ‘टीम बी’च्या कोणत्या तरी सदस्याने ही ट्रॉफी जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर सर्वांचा अंदाज खरा ठरवत या चुरशीच्या लढाईत सूरजने बाजी माली आहे. यानिमित्त सूरजवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर त्याच्या मोढवे या मुळगावी डीजे लावून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.

आणखी वाचा – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गजकेसरी राजयोगामुळे कर्क व सिंह व राशीच्या लोकांना धनलाभ, जाणून घ्या…

आता सर्वजण सूरजच्या गावी येण्याची आतुरेतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता ठरलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट करणार असल्याची घोषणादेखील केली आहे.    

Tags: Aarya Jadhao appreciation Suraj ChavanBigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner on ex girlfriend

"एक्स गर्लफ्रेंडकडे पुन्हा जाणार सूरज चव्हाण?", प्रश्न विचारताच म्हणाला, "माझ्या बच्चाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.