Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा सर्वच स्पर्धक गाजले. घरातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र या पर्वातील सर्वात जास्त गाजलेली स्पर्धक म्हणजे आर्या जाधव. निक्कीला मारल्यामुळे आर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. महिन्याभरापूर्वी आर्याने निक्कीच्या कानशिलात मारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भाऊच्या धक्क्यावर तिला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आर्याचे अनेक चाहते व ‘बिग बॉस’चे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. तिला या घरात आणण्याची मागणीही केली गेली. मात्र याला काही प्रतिसाद मिळाला नाही. अशा गाजेलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची अखेर सांगता झाली. (Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर गोलीगत सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन, राजकीयसह अनेक क्षेत्रांतून सूरजला शुभेच्छा देण्यात आल्या. अशातच आर्यानेही सूरजच्या विजयानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. विजेत्याची घोषणा केल्यावर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं होतं. हाच फोटो आर्याने तिच्या स्टोरीवर रिशेअर करत सूरजचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
“ट्रॉफी जिंकली माझ्या भावाने! एकदम झापुक झुपूक काम केलं आहे भावा!” असं म्हणत आर्याने सूरजच्या विजयाचा आनंद शेअर केला आहे. आर्यासह घराबाहेर आल्यावर अनेक सदस्यांनी सूरज किंवा ‘टीम बी’च्या कोणत्या तरी सदस्याने ही ट्रॉफी जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर सर्वांचा अंदाज खरा ठरवत या चुरशीच्या लढाईत सूरजने बाजी माली आहे. यानिमित्त सूरजवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर त्याच्या मोढवे या मुळगावी डीजे लावून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.
आणखी वाचा – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गजकेसरी राजयोगामुळे कर्क व सिंह व राशीच्या लोकांना धनलाभ, जाणून घ्या…
आता सर्वजण सूरजच्या गावी येण्याची आतुरेतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता ठरलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट करणार असल्याची घोषणादेखील केली आहे.