Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर तुफान राडे होताना पाहायला मिळाले. या नव्या पर्वात स्पर्धक मंडळी अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का रितेश देशमुखने अक्षरशः गाजवला. टीम ए मधील स्पर्धकांची रितेशने चांगलीच कानउघडणी केली. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घनःश्याम दरवडे या टीम एच्या स्पर्धकांच्या चुकांचा पाढा वाचत रितेशने त्यांची शाळा घेतली. तर भाऊचा धक्क्यावर रितेशने स्पर्धकांची पोलखोल केली.
रितेशने चक्रव्ह्यूहमध्ये निक्की समोर टीम एचा खुलासा केला. टीम एमधील स्पर्धक निक्कीच्या मागे काय बोलतात हे निक्की समोर आलं आणि तिने टीम सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने असाही शब्द दिला की, “काही झालं तरी चालेल टीम एच्या स्पर्धकांना मी ही ट्रॉफी उचलू देणार नाही”. यानंतर आता टीम एचे सगळेच स्पर्धक एकीकडे व निक्की एकीकडे पाहायला मिळत आहे. तर टीम बी मधून आर्याची एक्झिट होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. आर्यासमोर टीम बीच गॉसिप आलं. त्यामुळे आर्याचाही हिरमोड झाला.
यानंतर आता टीम ए बरोबर आर्या एकत्र येत निक्की विरोधात गॉसिप करताना दिसत आहेत. आर्या जान्हवीजवळ जात तिच्याशीही संवाद साधताना दिसत आहे. तर एकीकडे ती अरबाज, वैभव यांच्यासह बसून चर्चा करताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरबाज व आर्या मिळून निक्कीला त्रास देण्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सावधान! Bigg Boss च्या घरातील स्पर्धकांची झोप उडणार, मानकाप्याची एण्ट्रीने आलं मोठं संकट
आर्या म्हणते, “आता आपल्या सगळ्यांचं दुश्मन एकच आहे”. यावर अरबाज म्हणतो, “निक्की”. अरबाज यावर म्हणतो, “निक्कीला त्रास द्यायचा आहे”. यावर आर्या म्हणते, “हो पूर्णपणे”. तेव्हा अरबाज म्हणतो, “तू निक्कीला त्रास देणार तर तिला काहीच फरक नाही पडणार. तू अभिजीतला त्रास दे”. त्यानंतर इकडे आर्या व निक्की एकत्र बसून बोलत असतात. तेव्हा निक्की आर्याला असं बोलताना दिसत आहे की, “त्या लोकांची मला वीट येतेय”.