Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५चं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. या पर्वात कलाकार मंडळी अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत. सततचे वाद, राडे, भांडण, मारामाऱ्या हे सगळं काही ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतय. या स्पर्धकांवर जरब बसवायला आता ‘बिग बॉस’च्या घरात मानकाप्याची एण्ट्री होणार आहे. स्पर्धकांना भीती घालायला स्पर्धकांवर वर्चस्व गाजवायला ‘बिग बॉस’च्या घरात मानकाप्याची एण्ट्री झाल्याने स्पर्धकांना सावधान राहण्याचा इशारा ‘बिग बॉस’ यांनी दिलेला पाहायला मिळतोय. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात एका मानकाप्याची एण्ट्री झालेली पाहायला मिळतेय.
प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत, “सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे,”एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”. तर सगळे स्पर्धक गोंधळून जातात आणि आश्चर्यचकित होतात आणि एकमेकांच्या जवळ जातात. घरात जोरजोरात आवाज येतो तेव्हा सगळे स्पर्धक इकडे तिकडे धावू लागतात. त्यानंतर सर्व स्पर्धकांना बाहेर बोलावलं जातं तेव्हा समोरच्या असलेल्या काचेवर “एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”, असे लाल अक्षरात लिहून आलेलं असतं.
आणखी वाचा – Asha Sharma passes away : ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हे पाहून तर स्पर्धक मंडळी फारच घाबरतात. आता स्पर्धकांना एकटं फिरु नका असा संदेश दिला असतानाच कोणता स्पर्धक या मानकाप्याच्या तावडीत सापडणार का?, या मान काप्याला कोणता स्पर्धक सडेतोड उत्तर देणार हे पाहणं येणाऱ्या आगामी भागात रंजक ठरणार आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगलीच पोलखोल केलेली पाहायला मिळाली. रितेशने स्पर्धकांचे खरे चेहरे इतर स्पर्धकांसमोर आणले त्यामुळे अनेकांचे डोळे उघडले. निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव, घनश्याम या टीम ए मधील स्पर्धकांची रितेशने चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली.
तर टीम बी मधील स्पर्धकांची शाळा घेत त्यांचं कौतुकही केलेले दिसलं. एकूणच यंदाच ‘बिग बॉस’ ही स्पर्धक मंडळी विशेष गाजवताना दिसत आहेत. आता ‘बिग बॉस’च्या पर्वाचा खरा विजेता कोण ठरणार?, ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाणार हे सारं येणाऱ्या भागांमधूनच लवकरच कळेल.