बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi :  लायकी, लाज काढली अन्…; निक्कीच्या पावलांवर पाऊल ठेवतेय जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकरांचा अपमान, नक्की चुक कोणाची?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 7, 2024 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Janhvi Killekar insulted Varsha Usgaonkar said that she has no common sense and shame

निक्कीनंतर जान्हवीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान, टास्कदरम्यान नको नको ते बोलली अन्...; लाज आणि अक्कलही काढली

Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मंगळवारी १०वा एपिसोड प्रसारित झाला. या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं आणि यात अंकिता वालावालकर ही घराची पाहिली कॅप्टन झाली.  टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. या खेळातील अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉसचा टास्क सर्वांना वाचून दाखवला. या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात. (Janhvi Killekar insulted Varsha Usgaonkar)

या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो. मोटरमनसाठी दोन जागा असतात. त्याशिवाय, ट्रेनमध्ये हिरवी व लाल मार्गिका असे दोन भाग केले असतात. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गिकेवर धावणार हे ठरते. त्या मार्गिकेवर जे स्पर्धक बसले आहेत, त्यांच्यातील एक सदस्य कॅप्टनपदासाठी पात्र ठरणार असतो. वर्षा संचालक असल्याने त्या अंकिता व अभिजीत अशी नाव मोटरमन म्हणून जाहीर करतात. मात्र हा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हणत जान्हवी, अरबाज व निक्की मोठा गोंगाट करतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  “या शेंबड्या अरबाजसाठी…” अरबाजच्या वागणूक व अरेरावीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “नंतर भीक मागत…”

या गोंगाटात जान्हवी वर्षाताईंना नको नको ते बोलते. यावेळी “ताई हे अनफेअर (अयोग्य) आहे” असं वारंवार म्हणते. याचवेळी अरबाजही मोठ्या आवाजात खेळ अयोग्य पद्धतीने खेळला असल्याचे मोठ्या आवाजात म्हणत असतो. तेव्हा वर्षाताई पुन्हा एकदा “मी माझा निर्णय अनफेअरच दिला आहे” असं म्हणतात. त्यावर जान्हवी त्यांना “तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं बोलायला. हे असले संचालक तुम्ही बसवता. यांना अक्कल पण नाहीये. इतका घाणेरडा गेम ताई, तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं म्हणाली. याचपुढे जान्हवीने वर्षाताईंचा उल्लेख ‘नोकर’ असाही केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  कोकणची चेडवा हो नाखवा!, ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची पहिली कॅप्टन ठरली अंकिता वालावलकर, गेम चेंज होणार

दरम्यान, नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या टास्कमध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर जिंकली असून ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान तिला मिळाला. अंकिता कॅप्टन झाल्यावर डिपी दादा अंकिताला उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतो. त्या ठिकाणी यंदाच्या सीझनमधील कॅप्टनसाठी अभिजित व इतर सदस्य गाणं गातात. मात्र, यात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हा ग्रुप सहभागी झालेला नसतो.      

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Subodh Bhave stuck in traffic

Video : घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे कलाकारही त्रस्त, आता सुबोध भावेनेही दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, "या ट्राफिकमुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.