‘बिग बॉस सीजन ५’ मध्ये स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या आठवड्यात असणाऱ्या १५ स्पर्धकांमध्ये होणारी सततचे वाद, सततची भांडण, धक्काबुक्की, मारामाऱ्या हे सारं पाहणं रंजक ठरत असलं तरी अनेकांना खटकणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या दोन गट झाले असून दोन्ही गटांमध्ये तुफान वाद आणि बाचाबाची होताना पाहायला मिळत आहे. हे सारं पाहून प्रेक्षक मंडळी व कलाकार मंडळी यांच्याकडूनही यंदाच्या सीजनवर नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. (Saorabh Choughule On bigg boss marathi)
दरम्यान यंदाच्या सीजनच्या पहिल्याच आठवड्यात घेतल्या जाणाऱ्या भाऊचा धक्का या रितेश देशमुखच्या वीकेंडमध्ये त्याने स्पर्धकांची चांगली शाळा घेतली आणि कान उघडणी केलेली पाहायला मिळाली. असं असलं तरी सलग दुसऱ्या आठवड्यातही स्पर्धक त्याच त्याच चुका करताना दिसून येत आहेत. अपशब्द. वाईट भाषा वापरत ही स्पर्धक मंडळी एकमेकांशी भांडताना दिसून येतात. त्यामुळे हा शो कुटुंबासह घरी पहावा की नाही असा प्रश्न देखील आता उपस्थित करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सौरभ चौगुले याने यावर आक्षेप घेत भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर सौरभने पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस’मध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेतला आहे.
सौरभने पोस्ट शेअर करत, “लायकी, भीक व घाणरेडी भाषा वापरली जाते. खरंच हा कुटुंबाबरोबर पाहिला जाणारा शो आहे का?”, असं म्हणत सौरभने राग व्यक्त केला आहे. अभिनेता सौरभ चौगुले म्हणजेच ‘बिग बॉस सीजन ५’ मधील स्पर्धक योगिता चव्हाण हिचा नवरा आहे. योगिता व सौरभ ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचले. या मालिकेमुळे योगिता व सौरभला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. मालिकेत प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाल्यानंतर जेव्हा ही मालिका संपली त्यावेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शाही विवाहसोहळा उरकत दोघांनी लग्न गाठ बांधलेली पाहायला मिळाली. त्यानंतर योगिता थेट ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ च्या घरात दिसली. आपली बायको ज्या रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आहे त्या शो मधील भाषा उर्मट असल्याने सौरभने आवाज उठवलेला पाहायला मिळत आहे.