शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा”, किर्तनकाराचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “आई गेली तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan and Dhananjay Powar emotional story see the details

Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाण व धनंजय पोवारच्या खेळाचे कीर्तनकारांकडून कौतुक, संघर्षही सांगितला

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार सुरज चव्हाण. सुरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत, त्यांच्या हृदयावर राज्य केलं. ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सुरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. खेळ समजला नसला, तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सुरज स्वतःला ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सिद्ध करताना दिसतोय. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

सूरजच्या साध्या भोळ्या स्वभावावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने अनेक साध्या सोप्या गोष्टी केल्या आहेत, पण त्यांच्या याच कृतीचे अनेकांकडून कौतुक झालं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून तसंच या घरातील अनेक माजी स्पर्धकांकडून त्याचे कौतुक झालं आहे आणि आता तर त्याला या क्षेत्रातील नसलेल्या व्यक्तींकडूनही पाठींबा मिळत आहे. वारकरी सांप्रदायातून सूरजला पाठींबा मिळत असून त्याच्या खेळाचे कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan 😎🔥 (@suraj.chavan_fc)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की ‘बिग बॉस’ची लाडकी आहे का?”, निक्कीची आरेरावी पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “तिला शिक्षा द्या नाहीतर…”

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक कीर्तनकार सूरजच्या खेळाचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळणार आहे. या व्हिडीओनध्ये कीर्तनकार असं म्हणतात की, “‘बिग बॉस’ चांगलं की वाईट हा प्रश्न बाजूला ठेवा. पण इथे बसलेल्या सर्वांना एक वाक्य सांगतो आयुष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आला तर त्या गोलीगत सूरज चव्हाणकडे पाहा आणि कोरोना काळात स्वत:ला संपल्याची जाणीव ज्याला झाली होती टॉप डीपी म्हणजेच धनंजय पोवार आठवून पाहा. वडील गेले तेव्हा सूरज गोट्या खेळत होता. तेव्हा लोकांनी त्याला येऊन सांगितलं की, तुझे वडील गेले. त्यानंतर त्याने गोट्या तशाच खिशात टाकल्या आणि बापाचं शेवटचं तोंड पाहिलं. बिचाऱ्याला तेव्हा काही कळतही नव्हतं. त्यानंतर आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने सगळ्यांकडे पैसे मागितले. तेव्हा खोकून खोकून आई गेली पण तो काही करु शकला नाही”.

आणखी वाचा – “याक्षणी तिची खूप आठवण येते आणि…”, वहिनीच्या निधनाबाबत बोलताना हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तिला जे शब्द दिले…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “फक्त गणपती बसवायचा म्हणून सूरज तीन दिवस कामाला गेला आणि काबाडकष्ट केले. गणपतीपुरते पैसे जमा केले. पण वेड्याबरोबर काय राहायचं म्हणून गावातल्यांपैकी कुणी गणपती बसवायला आलं नाही. पण त्याने एकट्याने गणपती बसवला आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहा. त्याच्यामुळे ‘बिग बॉस’ पहिल्या नंबरवर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल तेव्हा एकदा ‘बिग बॉस’मधील हे दोघे आठवून पाहा. कारण या घरात सर्वांना भांडताना पाहिले पण सूरज एकटा झाडू मारताना दिसला”.     

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi season 5 jahnavi killekar son

नवराच करतो लेकाचा सांभाळ, जान्हवी किल्लेकरने सांगितली खऱ्या आयुष्यातील संपूर्ण कहाणी, म्हणाली, "तो बाबांच्याच मांडीवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.