रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवराच करतो लेकाचा सांभाळ, जान्हवी किल्लेकरने सांगितली खऱ्या आयुष्यातील संपूर्ण कहाणी, म्हणाली, “तो बाबांच्याच मांडीवर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 7:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5 jahnavi killekar son

जान्हवी किल्लेकरला येत आहे लेकाची आठवण, 'बिग बॉस'च्या घरात सांगितल्या आठवणी

Bigg Boss Marathi season 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’प्रेमींच्या हा सीझन पसंतीस उतरत आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीने ‘कलर्स मराठी’वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. जान्हवीने जीवनात खूप संघर्ष केला आहे. अगदी बॅकग्राउंड डान्सर ते मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत जान्हवीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

जान्हवीचं मालिकाविश्वातील आयुष्याची जितकी चर्चा आहे तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते. जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर आहे. जान्हवी व किरण यांचा प्रेम विवाह आहे. डान्स क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती. कमी वयात जान्हवी व किरण यांनी लग्न केले. जान्हवीला आठ वर्षाचा मुलगा देखील आहे. जान्हवीच्या लाडक्या लेकाचे नाव इशान किल्लेकर असे आहे. सोशल मीडियावर जान्हवी नेहमीच इशान बरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतचे एकमेकांवर आरोप, घरातील इतर सदस्यांनी उडवली खिल्ली, अंकिता म्हणाली, “दोघात तिसरा आणि…”

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

सध्या जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. मालिकेत खलनायिका म्हणून वावरणारी जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरातही व्हिलन ठरली. बिग बॉसच्या घरात वयानं मोठ्या असलेल्या वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांचा अपमान केल्यानं जान्हवी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. त्यामुळं इंडस्ट्रीतल्या इतर सेलिब्रिटींनीही तिच्यावर टीका केली आहे. जान्हवीचे तिच्या कुटुंबियांवर भरपूर प्रेम आहे. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर आता जान्हवी तिच्या लेकाला मिस करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : नवरा असावा तर असा! सई लोकुरला नवऱ्याने वाढदिवसाला दिलं हटके सरप्राइज, एक चिट्ठी निवडायला सांगितली अन्…

नुकताच जान्हवीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यांत जान्हवी लेकाची आठवण काढताना दिसत आहे. जान्हवी सहस्पर्धकांसह तिच्या लेकाच्या आठवणी शेअर करताना दिसत आहे. जान्हवी म्हणते, “पाऊस पडला की मला इशान शाळेत गेला असेल की नाही याची काळजी वाटते. शाळा घरापासून जवळ आहे. तरीसुद्धा त्याचा बाबा त्याला गाडीनेच शाळेत सोडायला जातो. त्याच्या बाबांचा दिवसचं त्याच्यापासून सुरु होतो आणि संपतो. सकाळी उठल्यावर शाळेत सोडतो. सहा तासांत त्याचा बाबा त्याची काम करुन घेतो. शाळेतून आल्यावर ट्युशनला सोडतो. ट्युशनवरुन आल्यावर त्याला फुटबॉलच्या क्लासला घेऊन जातो. तर आई जेवण करतात. इशानला त्याचा बाबाचं झोपवतो. आणि तो इतका मोठा झाला आहे तरी इशान त्याच्या बाबाच्या मांडीवरचं झोपतो”.

Tags: bigg boss marathi season 5jahnavi killekarjahnavi killekar son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
06 september 2024 Thursday daily horoscope Marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

06 September Horoscope : कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार खुशखबर, तर धनु राशीच्या लोकांना मिळणार शुभ संकेत, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.