शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सदस्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, फक्त अरबाजच शांत बसला, पुरुषोत्तमदादा म्हणाले, “मला खटकलं की…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 16, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Purushottamdada Patil commented on Arbaaz not cheering Chhatrapatri Shivaji Maharaj.

Bigg Boss Marathi 5मध्ये अरबाजने अरबाजने छत्रपत्री शिवाजी महाराजांचा जयजयकार का केला नाही?, पुरुषोत्तमदादा पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सध्या चांगलाच गाजत आहे. या घरात २८ जुलैला सुरुवात झालेल्या या शोला प्रेक्षकांकडून या शोला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. १६ स्पर्धकांपासून सुरु झालेल्या या स्पर्धकांपैकी एकाचा स्पर्धकाचा प्रवास संपला होता. हा स्पर्धक म्हणजे पुरुषोत्तमदादा पाटील. बिग बॉस मराठी’च्या घरात पुरुषोत्तमदादा त्यांचा एक वेगळाच रंग घेऊन आले होते. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला. ‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र त्यांच्या एक्झिटनंतर त्यांच्यापेक्षा आरबाजची चर्चा जास्त रंगली होती. (Bigg Boss Marathi 5 Update)

पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरुनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुरुषोत्तम दादा पाटील आणि घरातील इतर सर्व स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत होते. पण त्यावेळी अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. यावर नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. यावर आता स्वत: पुरुषोत्तमदादा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  जान्हवी-निक्कीने जमिनीवर ढकलून खेचताच योगिता भडकली, दोघींशी दोन हात करत बिनधास्त नडली, कॅप्टन तिच होणार?

पुरुषोत्तम दादा पाटील यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील सर्व सदस्यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांना घरातील प्रत्येक स्पर्धकाची चांगली व खटकणारी सवय विचारण्यात आली. तेव्हा अरबाजबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “मी स्पष्टपणे सांगतो की, अरबाज हा मला न आवडणारा व्यक्ती आहे. त्याने मला समजूनच घेतलं नाही. नॉमिनेशन टास्कमध्ये त्याने मला मुद्दाम नॉमिनेट केलं होतं आणि दुसरी मला खटकलेली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयजयकार करु शकत नाही. त्याच्याविषयी मला माझ्या मनात आवडणारी किंवा खटकणारी गोष्ट ठेवायचीच नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कुत्रीच आहे, हिची औकात…”, आर्याला घाणेरड्या शब्दांत निक्कीने सुनावलं, मर्यादा ओलांडत तिच्या अंगावर पडली अन्…

दरम्यान, ४ ऑगस्टला पार पडलेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. यामुळे घरातील काही सदस्य भावूक झाले. पुरुषोत्तम दादा पाटील घरातून गेल्याने घन:श्याम दरवडे अधिक भावूक झाला. घरातून बाहेर जाताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी ‘राम कृष्ण हरी’ म्हणत सदस्यांना रामराम केला. पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी येथील प्रसिद्ध किर्तनकार आहेत. याशिवाय किर्तनावेळी नाचतात म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही केली जाते.    

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5Purushottamdada Patil
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates new captain Arbaaz Patel know more about

Bigg Boss Marathi च्या घरातील इतर सदस्यांना हरवून अरबाज पटेल झाला नवीन कॅप्टन, मात्र कौतुक सूरज चव्हाणचं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.