Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे. शोमध्ये येणारे ट्विस्ट व खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. शोमधून एकामागून एक रंजक वळण येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या शोविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या घरात अनेकदा भांडणं, वाद व मारामारी पाहायला मिळते. अशातच कालच्या भागातही टास्कदरम्यान निक्की व अरबाज यांच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये निक्कीने आर्याचा उल्लेख कुत्री म्हणून केला. टास्कमध्ये झालेल्या झटापटीत निक्कीने आर्याबद्दल हा शब्द वापरला आहे. (Bigg Boss Marathi 5 Update)
कॅप्टन पद मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना बोटीत बसून मोती शोधायचे होते आणि यातून कॅप्टन पदाचे उमेदवार बाजूला करायचे होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य बोटीतून मोती शोधण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरून त्यांना कॅप्टन पदासाठीचा योग्य उमेदवार मिळेल. त्यामुळे या टास्कमध्ये निक्की व अरबाज यांच्यात मोती मिळवण्यासाठी चढाओढ झाल्याची पाहायला मिळाली. यावेळी टास्कमध्ये आर्याने इरीनाकडून मोती घेतले. निक्की ते मोती आर्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती.
यावेळी निक्की व आर्या त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. आर्याकडून मोती हिसकावण्याच्या झटापटीत निक्कीकडून आर्यावर चावल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी निक्की तिला “चावते, चावते, हीच औकात आहे तुझी. कुत्री आहे तू” असं म्हटलं आहे. यावेळी वैभवने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. या खेळात निक्की, अरबाज, जान्हवी व सूरज यांच्या संघाने विजय मिळवला. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो अधिकाधिक रंजक होत चालला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरामधील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे. आता तिचा कॅप्टन्सीचा कालावधी संपला आहे. आता घरातील नवीन कॅप्टन होण्यासाठी सदस्य खूप प्रयत्न करत आहेत. कॅप्टन्सीसाठी आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. टास्क जिंकून ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधील नवीन कॅप्टन कोण होणार, हे समजणार आहे.