Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्की तांबोळीच्या भांडणाने झालेली पाहायला मिळाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात दररोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमधून ‘बिग बॉस’च्या घरात आता दुसऱ्या कॅप्टन पदासाठी लढत होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य कॅप्टन पदासाठी एमकमेकांच्या विरुद्ध उभे राहणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 daily update)
नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये कॅप्टन पद मिळवण्यासाठी घरातील धाकड गर्ल्समध्ये राडा होणार आहे. जान्हवी, निक्की व योगिता या तीन स्पर्धकांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. या तिघींचा नुकताच आलेला प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये निक्की व जान्हवी योगिताकडून फ्रेंच फ्राइज खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या दोघींना योगिता चांगलीच पुरुन उरत असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या कालच्या भागात टीम Aच्या सदस्यांनी टास्क जिंकला होता. त्यामुळे ‘बिग बॉस’ने यामध्ये नवीन ट्विस्ट आणला आणि जिंकलेल्या टीमने कॅप्टन्सी पदासाठी योग्य तो उमेदवार निवडून द्यावा असं सांगितलं. यात बिग बॉसने फ्रेंच फ्राइज तोडायला सांगितलं आहे. त्यामुळे या टास्कमध्ये आता कोण जिंकणार आहे? हे आजच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, पहिल्या कॅप्टन्सी टास्कवरुन घरात खूप राडे झाले होते. वर्षा यांच्या पक्षपातीपणामुळे अंकिता कॅप्टन झाल्याचा आरोप निक्की व जान्हवी यांनी केला होता. त्यामुळे आता निक्की व तिची टीम या दुसऱ्या कॅप्टन पदासाठीच्या टास्कमध्ये बाजी मारणार का? योगिता, निक्की व जान्हवी यांपैकी कोण टास्क जिंकणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.