Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात खेळ आणि टास्क जितके महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते ते म्हणणे कॅप्टन्सीचे पद. कारण या कॅप्टन्सी पदाबरोबरच येतात त्या अनेक सुविधा आणि जबाबदऱ्या. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये काल एक नवीन कॅप्टन झाला आणि तो म्हणजे अरबाज पटेल. कॅप्टनीसाठी निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज, निखिल, घन:श्याम आणि योगिता या स्पर्धकांमध्ये टास्क खेळवण्यात आला. ज्या स्पर्धकाकडे खेळाच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त फ्रेंच फ्राइस असतील तो सदस्य या आठवड्यात कॅप्टन होणार होता. निक्कीच्या टीममधील एकूण चार स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार होते त्यामुळे साहजिकच त्यांनी ग्रुप करून हा टास्क खेळला आणि अंतिम फेरीपर्यंत निखिल, योगिता, सूरज असे सगळे प्रतिस्पर्धी खेळाडू बाद होऊन अरबाज या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला. (Bigg Boss Marathi 5 New Captain)
पहिल्या फेरीत योगिता व घन:श्याम बाद होतात. दुसऱ्या फेरीत अरबाज अॅक्शन मोडमध्ये जातो आणि सूरज-निखिलकडून फ्राइज खेचून घेतो. अरबाज सर्व फ्राइज निक्की आणि जान्हवीला आणून देतो. तर सूरज त्यांच्याकडून ते खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. पदासाठी सूरजने अरबाजबरोबर चांगला लढा दिला. मात्र सूरजचा अरबाजबरोबरचा हा लढा तितकासा चालला नाही. त्यामुळे कॅप्टन्सीचे पद अरबाजकडे आले. दुसऱ्या फेरीत सूरज आणि निखिल बाद होतात. तिसऱ्या फेरीत जान्हवी आणि निक्की बाद झाल्याने अरबाज पटेल बिग बॉस मराठीचा नवा कॅप्टन होतो. अरबाजला कॅप्टन्सी मिळाल्यामुळे निक्की व जान्हवी यांनी चांगलाच आनंद व्यक्त केला.
अंतिम फेरीत स्वत:कडच्या फ्रेंच फ्राइस अरबाजच्या बॉक्समध्ये टाकत या दोन मैत्रिणींनी ठरवल्याप्रमाणे अरबाजला विजयी केलं. यानंतर अरबाजने कॅप्टन रुमचा ताबा घेतला.अरबाज कॅप्टन झाल्यावर जान्हवी व निक्की प्रचंड आनंदी होतात. यावेळी निक्की लिव्हिंग परिसरात तिच्या कापड्यांचे ठेवलेले बास्केट आत नेऊन ठेवते. अंकिताच्या कॅप्टन्सीच्या वेळेस तिने पॅडीबरोबर मोठा वाद घातलेला असतो. याचीच आठवण म्हणून पॅडी येतात आणि निक्की व अरबाज यांना टोमणा मारत त्या घटनेची आठवण करुन देतात. तेव्हा निक्की असं म्हणते की, “आता माझा आवडता आणि मित्र या घरचा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे मी पाहिजे ते करणार”.
दरम्यान, अरबाज कॅप्टन झाला असला तरी या पदाचा योग्य दावेदार सूरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. कॅप्टनसी कार्यात अरबाज विजयी झाला असला तरीही जनतेने पूर्णत: बहुमताने सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. सूरजने टास्कमध्ये ज्याप्रकारे अरबाज-जान्हवी-निक्की या त्रिकुटाला टक्कर दिली ती खरंच बघण्याजोगी होती. याबद्दल अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत. तरी आता येत्या काळात अरबाज घराचा ताबा कसा सांभाळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.