Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सध्या चांगलाच गाजत आहे. या घरात २८ जुलैला सुरुवात झालेल्या या शोला प्रेक्षकांकडून या शोला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. १६ स्पर्धकांपासून सुरु झालेल्या या स्पर्धकांपैकी एकाचा स्पर्धकाचा प्रवास संपला होता. हा स्पर्धक म्हणजे पुरुषोत्तमदादा पाटील. बिग बॉस मराठी’च्या घरात पुरुषोत्तमदादा त्यांचा एक वेगळाच रंग घेऊन आले होते. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला. ‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र त्यांच्या एक्झिटनंतर त्यांच्यापेक्षा आरबाजची चर्चा जास्त रंगली होती. (Bigg Boss Marathi 5 Update)
पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरुनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुरुषोत्तम दादा पाटील आणि घरातील इतर सर्व स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत होते. पण त्यावेळी अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. यावर नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. यावर आता स्वत: पुरुषोत्तमदादा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
पुरुषोत्तम दादा पाटील यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील सर्व सदस्यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांना घरातील प्रत्येक स्पर्धकाची चांगली व खटकणारी सवय विचारण्यात आली. तेव्हा अरबाजबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “मी स्पष्टपणे सांगतो की, अरबाज हा मला न आवडणारा व्यक्ती आहे. त्याने मला समजूनच घेतलं नाही. नॉमिनेशन टास्कमध्ये त्याने मला मुद्दाम नॉमिनेट केलं होतं आणि दुसरी मला खटकलेली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयजयकार करु शकत नाही. त्याच्याविषयी मला माझ्या मनात आवडणारी किंवा खटकणारी गोष्ट ठेवायचीच नाही”.
दरम्यान, ४ ऑगस्टला पार पडलेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. यामुळे घरातील काही सदस्य भावूक झाले. पुरुषोत्तम दादा पाटील घरातून गेल्याने घन:श्याम दरवडे अधिक भावूक झाला. घरातून बाहेर जाताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी ‘राम कृष्ण हरी’ म्हणत सदस्यांना रामराम केला. पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी येथील प्रसिद्ध किर्तनकार आहेत. याशिवाय किर्तनावेळी नाचतात म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही केली जाते.