शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “हाच प्लेबॉय…”, निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “प्रेमाचं नाटक करत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 5, 2024 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 nikki and arbaaz troll

'बिग बॉस'मधील निक्की व अरबाज पुन्हा एकत्र, मिठी मारताच झाले ट्रोल

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा शेवट अगदी जवळ आहे. १०० दिवसांचा प्रवास ७० दिवसांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. हे पर्व संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. यंदाच्या पर्वात स्पर्धकांची अनेक नाती उघडकीस आली. दरम्यान, निक्की व अरबाज यांच्या मैत्रीच्या नात्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून पहिल्याच आठड्यात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते. त्यांनतर मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये वाद झालेले दिसले मात्र हे वाट मिटल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.

आठव्या आठवड्यात अरबाजने घरातून एक्झिट घेतली. यामुळे निक्की प्रचंड भावुक झाली होती. निक्कीच्या अश्रूंचा बांध त्यावेळी फुटला. अरबाज घराबाहेर गेल्यावर फॅमिली वीकमध्ये घरात निक्कीचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी निक्कीच्या आईने एक धक्कादायक बातमी सांगत तिला सावध केले. निक्कीच्या आईने अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचं कानावर आलं असल्याचं खुलेपणाने सांगितलं. हे ऐकताच निक्कीचा पारा चढला. त्यावेळी आता अरबाज समोर आला तर माझा राग अनावर होईल, अशी भीतीही तिने स्पर्धकांसमोर बोलून दाखविली.

आणखी वाचा – “ज्या परिस्थितून तो आला आणि…”, सूरजच्या गावी जाणार वर्षा उसगांवकर, म्हणाल्या, “प्रसिद्धी मिळाली त्यानंतर…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अखेर ग्रँड फिनालेला एक दिवस शिल्लक असताना म्हणजेच शेवटच्या दिवशी अरबाजने घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. संपूर्ण सीझनमध्ये सहभागी झालेले सगळे सदस्य रिएन्ट्री घेतानाचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, अरबाज धावत येत निक्कीला मिठी मारतो आणि तिला उचलून बेडरुम एरियामध्ये घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर दोघे हातात हात धरत एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. निक्की अरबाजला थेट सवाल करत “तू जाताना रडला नाही, मला वाटलं खरंच तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तुला फरक नाही पडला”, असं म्हणताना दिसली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “उद्याही तूच विजेता राहशील”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “माझ्या प्रार्थना…”

आता अरबाजला निक्की माफ करणार का?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ट्रोल करत त्यांच्या गळाभेटीवरुन आक्षेप घेतला आहे. “लहान मुलं कार्यक्रम बघतात हे ‘बिग बॉस’ला आता दिसत नाही का”, “काय तो ड्रामा, काय ते नाटक”, “अरबाज फसवा आहे. स्वतःच पाच वर्षांचं नातं तोडून इथे प्रेमाचं नाटकं करतोय. लोकांनी बरोबर तुझी जागा दाखवली”, “सूरज जो निक्कीला बोलला ते खर झालं, निक्की अरबाज यांची गळाभेट दिसली”, “हा अरबाज एक नंबरचा प्लेबॉय आहे. प्रत्येक शोमध्ये याला प्रेम होतं”, “जे काय करायचं बाहेर जाऊन करा लहान मुलं शो बघतात”, अशा अनेक कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5nikki and arbaaz patel troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
 Bigg Boss 18 House Photo

 गुहेसारख्या खोल्या, घराला किल्ल्यासारखा टच, १०७ कॅमेरे अन्…; Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.