Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले अगदी एका दिवसावर येऊन पोहोचला आहे. काही वेळातच ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार हे घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा ‘बिग बॉस मराठी’कडे वळल्या आहेत. यंदाच्या या पर्वात सहा फायनलिस्ट उरले असल्याचे दिसतेय. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि धनंजय पोवार हे स्पर्धक ‘बिग बॉस’चे सहा फायनलिस्ट ठरले आहेत. या सहा स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक विजेतेपदावर नाव कोरणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या या पर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून नाव कमावलेल्या सूरज चव्हाणचा प्रवास हा नक्कीच वाखाण्याजोगा होता. tiktok स्टार सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येत धुमाकूळ घालताना दिसला. लिहिता वाचता येत नसलं तरी माणसं वाचणं त्याने कधीच चुकवलं नाही आणि तो नेहमीच त्याच्या भोळ्याभाबड्या स्वभावानं आणि जिद्दीन प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिला. सूरज चव्हाणचा संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा चाहतावर्ग आहे. घरात प्रत्येक स्पर्धकाशी सूरज मिळून मिसळून वागला. प्रत्येक स्पर्धकाशी त्याचे चांगले संबंध होते. घराबाहेर पडलेल्या वर्षा उसगांवकर यांना तर सूरजने आईचा दर्जा दिलेला पाहायला मिळाला आणि कायम आईसारखीच माया करत वर्षा यांनी सूरजला वेळोवेळी समजून घेतलं आणि समजावूनही सांगितलं.
आणखी वाचा – धावत आला, मिठी मारली अन्…; Bigg Boss च्या घरात अरबाजची एण्ट्री, निक्की विचारणार जाब, व्हिडीओ व्हायरल
घराबाहेर पडल्यानंतर आता वर्षा उसगांवकर यांनी सूरज बाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा सूरजबद्दल बोलताना असं म्हणाल्या की, “हो.निश्चितच मला सूरजला पुन्हा भेटायला आवडेल. त्याच्या गावीही मी जाईन. बघू आता त्याच्या गावी जायचा योग कधी येतो. पण नक्की कधीतरी तो योग येईल. मला त्याला सदिच्छा द्यायच्या आहेत. मला असं वाटतं की तो ज्या परिस्थितून आला आहे त्यामुळे त्याचं सर्व चांगलं झालं पाहिजे. त्याला खूप मोठं हे व्यासपीठ मिळालं आणि जिथून तो महाराष्ट्राचा एक राजा झाला. सर्वांच्या मनावर त्याने राज्य केलं”.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, “त्याला महाराष्ट्रात विशेष प्रसिद्धी मिळाली. मला असं वाटतं त्याला अशा प्रकारची व्यासपीठ मिळायला हवीत. त्याला स्वतःच मत आहे आणि आता तो स्वतःच मत त्याच्या ग्रामीण भाषेत का होईना मांडू शकतो, त्यामुळे त्याच्याशी संपर्कात राहायला मला नक्कीच आवडेल”.