शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालक, अभिजीत, अंकिता व जान्हवीला नको ती कामे सांगितली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 25, 2024 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new task Nikki Tamboli team won and Varsha Usgoankar, Suraj Chavan and DP Powar become owners.

Bigg Boss Marathi 5 च्या सांगकाम्या आणि मालक टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली असून वर्षा, सूरज व डीपी हे मालक झाले आहेत.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी प्रेक्षकांमध्ये चढाओढ पहायलाअ मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या शोमधील प्रत्येक सदस्याची चर्चा होत आहे. एकूण दहा आठवडे हे पर्व सुरु राहील त्यानंतर ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अंतिम लढतीत दावेदार होण्यासाठी सगळेच स्पर्धक मेहनत करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

सध्या घरात नवव्या आठवड्याचा खेळ सुरू आहे. यानिमित्त ‘बिग बॉस’कडून सदस्यांना एक हटके टास्क देण्यात आला आहे. हा टास्क ऐकताच सगळ्यांना धक्का बसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. सध्या घरात कॅप्टन नाहीये त्यामुळे कॅप्टन होण्यासाठी मंगळवारच्या भागात ‘बिग बॉस’कडून एक नवीन टास्क देण्यात आला  आणि यांचे नाव होते सांगकाम्या आणि मालक. सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे. यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…”, ‘लापता लेडीज’ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, “आनंद आहे की…”

या टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली असून त्या टीममधील वर्षा, सूरज व डीपी हे मालक झाले आहेत. त्यामुळे आता ते सांगतील त्याप्रमाणे विरुद्ध टीममधील सदस्य त्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. याचा एक नवीन व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला तिच्यासाठी स्पेशल चहा बनवायला सांगत आहे तर वर्षा निक्की व जान्हवीला त्यांचे पाय चेपायला सांगत आहेत. यावेळी दोन्ही टीममधील सदस्य त्यांची कामे करताना एन्जॉय करत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सांगकाम्यांना टास्क पडणार भारी, निक्की-वर्षाची दादागीरी सुरु, ऑर्डर ऐकून जान्हवीला रडूही आलं अन्…

या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला समजावून सांगत असताना अभिजीत तिच्याबरोबर मस्करी करतो. तर वर्षा अंकिता व जान्हवी यांना “तुम्हाला काय वाटतं?” असं विचारते. यावर जान्हवी व अंकिता एकदम बरं वाटत आहे. आम्हाला तुमची सेवा करुन आनंद होत आहे” असं म्हणत आहे. यावर वर्षाही  दोघींची मस्करी करत “तुम्ही खरं सांगा हा…” असं म्हणत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओलाअ चांगला प्रतिसाद दिला आहे.

Tags: nikki tamboliSuraj Chavanvarsha usgoankar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Romit Raj On Shilpa Shinde

"तिच्याबद्दल वाईट ऐकू शकत नाही", लग्न तुटल्यानंतरही शिल्पा शिंदेबाबत एक्स बॉयफ्रेंडचं आहे 'हे' मत, म्हणाला, "तिचा निर्णय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.