Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी प्रेक्षकांमध्ये चढाओढ पहायलाअ मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या शोमधील प्रत्येक सदस्याची चर्चा होत आहे. एकूण दहा आठवडे हे पर्व सुरु राहील त्यानंतर ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अंतिम लढतीत दावेदार होण्यासाठी सगळेच स्पर्धक मेहनत करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
सध्या घरात नवव्या आठवड्याचा खेळ सुरू आहे. यानिमित्त ‘बिग बॉस’कडून सदस्यांना एक हटके टास्क देण्यात आला आहे. हा टास्क ऐकताच सगळ्यांना धक्का बसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. सध्या घरात कॅप्टन नाहीये त्यामुळे कॅप्टन होण्यासाठी मंगळवारच्या भागात ‘बिग बॉस’कडून एक नवीन टास्क देण्यात आला आणि यांचे नाव होते सांगकाम्या आणि मालक. सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे. यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे.
या टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली असून त्या टीममधील वर्षा, सूरज व डीपी हे मालक झाले आहेत. त्यामुळे आता ते सांगतील त्याप्रमाणे विरुद्ध टीममधील सदस्य त्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. याचा एक नवीन व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला तिच्यासाठी स्पेशल चहा बनवायला सांगत आहे तर वर्षा निक्की व जान्हवीला त्यांचे पाय चेपायला सांगत आहेत. यावेळी दोन्ही टीममधील सदस्य त्यांची कामे करताना एन्जॉय करत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला समजावून सांगत असताना अभिजीत तिच्याबरोबर मस्करी करतो. तर वर्षा अंकिता व जान्हवी यांना “तुम्हाला काय वाटतं?” असं विचारते. यावर जान्हवी व अंकिता एकदम बरं वाटत आहे. आम्हाला तुमची सेवा करुन आनंद होत आहे” असं म्हणत आहे. यावर वर्षाही दोघींची मस्करी करत “तुम्ही खरं सांगा हा…” असं म्हणत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओलाअ चांगला प्रतिसाद दिला आहे.