मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…”, ‘लापता लेडीज’ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, “आनंद आहे की…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 25, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
"आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…", 'लापता लेडीज'ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, "आनंद आहे की…"

‘लापता लेडीज’ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर छाया कदम यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा उर अभिमानाने भरुन आला आहे. कारण छाया कदम यांनी महत्वाची भूमिका साकरलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची यंदाच्या ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्करसाठी निदव झालेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या बातमीमुळे सध्या छाया कदम यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांची ही भूमिकाही नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘लापता लेडीज’ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर छाया कदम यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या व्हॅनिटी व्हॅनसमोर उभ्या आहेत आणि या व्हॅनिटी व्हॅनवर त्यांच्या ‘लापता लेडीज’मधील ‘मंजू माई’ या नावाची पाटी लावलेली पाहायला मिळत आहे. या पाटीकडे छाया कदम या कौतुकाने पाहत पाठमोऱ्या उभ्या आहते. या पोस्टसह “आणि तुमची मंजू माई ‘ऑस्कर’पर्यंत पोहचली” अशी पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

आणखी वाचा – Urmila Matondkar Divorce : उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर पतीपासून होणार विभक्त?, घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती

छाया कदम यांनी असं म्हटलं आहे की, “अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की, आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहचावी. पण त्यासाठी त्या कलाकाराच्या वाट्याला तसे पात्र ही यावे लागते आणि मला आनंद आहे की, माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या माध्यमातून ‘मंजू माई’ हे पात्र आले. आज तुम्हा सर्वांच्या प्रेमाने तुमची ‘मंजू माई’ ‘ऑस्कर’पर्यंत पोहचली. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या आणि ‘मंजू माई’बरोबर राहो”.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : टास्कसाठी काहीही! अंकिताने वर्षा यांना जमिनीवर पाडलं, खेचलं अन्…; ‘कोकण हार्टेड गर्ल’वर प्रेक्षक नाराज

दरम्यान, छाया कदम यांनी ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’, ‘लापता लेडीज’ व मडगाव एक्सप्रेस’ व ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील. अशीच काहीशी त्यांची ‘मंजू माई’ ही भूमिका आहे

Tags: chhaya kadamLaapataa LadiesLaapataa Ladies Movie Oscar Selection Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 new promo

Bigg Boss Marathi : सांगकाम्यांना टास्क पडणार भारी, निक्की-वर्षाची दादागीरी सुरु, ऑर्डर ऐकून जान्हवीला रडूही आलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.