Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना अनपेक्षित टास्कचा सामना हा करावा लागतो. यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं पर्व विविधांगी टास्कमुळे विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात तब्बल १६ स्पर्धक आणि एक वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली. आता ‘बिग बॉस मराठी’चे काही दिवस शिल्लक असताना एकूण आठ स्पर्धक चुरशीची लढाई देताना दिसत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’ने या आठवड्यात आठहीच्या आठ स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे आता स्पर्धकांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळत आहे.
अरबाज पटेल हा शेवटचा कॅप्टन झाला आणि त्याच्या एक्झिटनंतर ‘बिग बॉसच्या घरात कुणीच कॅप्टन नाही आणि यामुळे घरात कामावरुन अनेकदा वाद होताना दिसत आहेत. यावर आता ‘बिग बॉस’ यांनी तोडगा काढला असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात कॅप्टन होऊन कामे वाटली जावी यासाठी बिग बॉस कडून एक नवीन टास्क देण्यात आला. सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे.
यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे. लगोरी टास्कमध्ये एकीकडे अंकिता वर्षा यांना खाली ढकलून देताना तसेच जमिनीवर खेचताना दिसली. या लगोरी टास्कमध्ये पहिल्या दोन फेऱ्या झाल्या त्यात एकाही टीमला बाजी मारता आली नाही. मात्र उर्वरित दोन फेऱ्यांमध्ये दुसऱ्या टीमने बाजी मारलेली दिसली. त्यामुळे डीपी, सूरज, वर्षा व निक्की हे मालक झाले तर अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी हे सांगकाम्या झाले.
नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, यामध्ये सांगकामे मालकांची सेवा करताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये सुरुवातीला निक्की असं बोलताना दिसतेय की, “चला ड्युटीला लागा सांगकाम्या”. त्यानंतर अंकिता व जान्हवी वर्षा ताईंचे पाय दाबताना दिसत आहेत. यावेळी वर्षा ताई माझा पाय व्यवस्थित दाबा असं सांगताना दिसत आहेत. तर जान्हवीच्या हाताला लागलेलं असतानाही ती डाव्या हाताने पीठ मळताना दिसतेय. तर इकडे डीपी देखील मला चहा हवाय अशी फर्माईश करताना दिसत आहे. तर एकीकडे निक्कीने अभिजीतला कामाला लावलेलं पाहायला मिळत आहे. तर जान्हवी वर्षा ताईचं पेडिक्युअर करतानाही दिसतेय, ही काम करुन जान्हवीला रडूही आलेलं पाहायला मिळत आहे.