शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : डाव उलटला! कॅप्टन्सीमधून बाद केलेले सदस्यच ठरवणार घरातील नवा कॅप्टन, जान्हवी-अंकिताचा चेहराच उतरला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 30, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Who will be the captain in week five see the details

Bigg Boss Marathi 5 च्या या आठवड्यात कोण होणार घरचा नवीन कॅप्टन? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीला अधिकच महत्त्व आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन झाल्यावर त्याला काही विशेषाधिकार मिळतात. यामुळे त्याचं नॉमिनेशनपासून संरक्षण होतं. शिवाय त्याला घरातील काही खास सुखसुविधाही मिळतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन जवळपास पाच आठवडे होत आहेत. दिवसेंदिवस या घरातील खेळ रंगत चालला आहे. त्यामुळे कॅप्टन्सीसाठीही स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता होती. त्यानंतर अरबाज कॅप्टन झाला. मात्र त्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोनच दिवसात गेम पलटला आणि निक्की तांबोळीला कॅप्टन्सी मिळाली. अरबाजने निक्कीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ही कॅप्टन्सी दिली होती. त्यानंतर आता या आठवड्यात कॅप्टन कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या नवीन कॅप्टन्सीचा टास्कचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या नवीन प्रोमोमधून घरातील स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडणार आहे. या आठवड्यातील कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार असून घरातील अंकिता, जान्हवी, वर्षा, वैभव आणि सूरजहे स्पर्धक कॅप्टन्सीसाठी उभे राहणार आहेत. या सदस्यांमधून एक जण कॅप्टन होणार आहे. या सदस्यांनाच आपापसात सहमती दर्शवून एक कॅप्टन निवडायचा आहे. पण त्यांच्यात बहुमत न झाल्याने ‘बिग बॉस’ ट्विस्ट आणतात. त्यामुळे बाहेर बसलेले इतर सदस्य कॅप्टन निवडू शकतात असं ‘बिग बॉस’ जाहीर करतात. ‘बिग बॉस’च्या या ट्विस्टने निक्की चांगलीच खूश होते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी लागताच अभिजीतने काढून दिले स्वत:चं जॅकेट, डीपी-अंकिता हसू लागले अन्…; नक्की चूक कोणाची?

गेल्या टास्कमध्ये टीम A जिंकल्यामुळे त्या टीममधील अरबाजने पॅडी, घनश्याम, निक्की व अभिजीत हे स्पर्धक कॅप्टन्सीसाठी उभे राहू शकत नाही असं म्हटलं. अशातच नेमून दिलेल्या स्पर्धकांमध्ये एकमत न झाल्यामुळे आता बाहेर बसलेले सदस्य घरचा नवीन कॅप्टन निवडणार आहेत. त्यामुळे आता बाहेर बसलेले स्पर्धक नक्की कोणाला कॅप्टन म्हणून निवडणार हे येत्या एपिसोडमध्ये समजणार आहे. या नवीन प्रोमोखाली अनेकांनी सूरजला पाठींबा दर्शवला आहे. अनेकांनी तो कॅप्टन व्हावा अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू माझा भाऊ”, निक्कीविरोधात बोलल्यानंतर अरबाजकडून सूरजचं कौतुक, म्हणाला, “तू कधी माझ्याविरुद्ध…”

दरम्यान, या आठवड्यात अंकिता, वर्षा, निक्की आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. परंतु या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहेत.  त्यामुळे आता यांच्यातील कोणता सदस्य या आठवड्यात बाहेर जाणार? की कुणीच बाहेर न जाता नवीन सदस्य या घरात येणार आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 abhijeet sawant wife support

"तुला नव्हे तर ग्रुपला तुझी गरज आहे", अभिजीत सावंतच्या बायकोचा टीम बीला टोमणा, म्हणाली, "मला अभिमान वाटतो की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.