शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला नव्हे तर ग्रुपला तुझी गरज आहे”, अभिजीत सावंतच्या बायकोचा टीम बीला टोमणा, म्हणाली, “मला अभिमान वाटतो की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 1:55 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 abhijeet sawant wife support

अभिजीत सावंतच्या पत्नीचा सल्ला, सावध करत दिला पाठिंबा

Bigg Boss Marathi 5 : महाराष्ट्राचा लाडका गायक व ‘इंडियन आयडॉल १’ चा विजेता गायक अभिजीत सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालत आहे. अभिजीतने त्याच्या सुमधुर गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘मोहब्बते लुटाऊंगा…’ या गाण्याने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा मानकरी अभिजीत होता. त्यावेळी अभिजीत तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. रातोरात स्टार झालेला हा गायक सध्या ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन टीम पडलेल्या दिसत आहेत. टीम ए मध्ये निक्की, अरबाज,जान्हवी, वैभव, घनःश्याम हे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. तर टीम बीमध्ये अभिजीत, अंकिता, पॅडी, धनंजय, सूरज, आर्या हे स्पर्धक पाहायला मिळाले. मात्र भाऊचा धक्का झाल्यानंतर स्पर्धकांच्या या टीम काहीशा कोलमडलेल्या दिसल्या. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डाव उलटला! कॅप्टन्सीमधून बाद केलेले सदस्यच ठरवणार घरातील नवा कॅप्टन, जान्हवी-अंकिताचा चेहराच उतरला अन्…

टीम बीचा कॅप्टन म्हणून अभिजीतकडे पाहिलं जातं. मात्र अभिजीत व निक्कीच्या मैत्रीमुळे टीम बी मधील सदस्य त्याला त्यांच्या टीमचा भाग समजत नाही. यावरुन रितेश देशमुखनेही अभिजीतला सावध केलं. असं असलं तरी अभिजीतहा स्वतःला टीम बीचा सदस्य मानतो. आणि तो त्याच्या टीम साठी खेळताना दिसतोय. मात्र नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये अभिजीतच्या पायाला दुखापत झाली असताना त्याने टीम साठी पातळ लोकमध्ये जाऊन नाणी शोधून आणण्याचा निर्णय घेतला. कारण, पातळ लोकमध्ये जायला त्याची पार्टनर निक्कीने नकार दिला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीच्या निर्णयामुळे डीपी ठरला पराभूत, बायको व आई भडकली, म्हणाली, “त्याचा खेळ जनतेने बघितला पण…”

अभिजीतचा हा निर्णय आणि खेळ पाहून सर्वत्र त्याच कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या खेळाचं आता त्याच्या बायकोनेही कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या बायकोने त्याचा खेळ पाहून इन्स्टाग्रामला स्टोरी पोस्ट केलेली पाहायला मिळत आहे. “मला तुझा अभिमान आहे. तुला खेळायला कोणत्याही ग्रुपची आवश्यकता नाही. याउलट त्यांना तुझी गरज आहे. माझ्या भक्कम माणसा”, असं म्हणत अभिजीतची पत्नी शिल्पा सावंत हिने नवऱ्याचं कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita Valawalkar and Nikki Tamboli arguing each over the nomination task

Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.