शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुम्ही एकटे सगळ्यांना भिडलात”, अरबाजलाही पुरून उरल्यानंतर सूरजचं रितेशकडून कौतुक, म्हणाला, “नवा हिरो…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 17, 2024 | 6:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo out host ritiesh dehsmukh praised to goligat suraj chavan know more

Bigg Boss Marathi 5 सूरज चव्हाणच्या गोलीगत पॅटर्नची रितेशलाही भुरळ, शेर म्हणत खेळाचं केलं कौतुक, जबरदस्त प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा तिसरा आठवडा चांगलाच गाजला. घरातील सदस्यांनी प्रत्येक टास्क जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण याची चर्चा चांगलीच रंगली. खेळत असताना सदस्य माणूसकीच विसरले. कोणी शाब्दिक मारा केला तर कोणी अगदी हाणामारी करत जिंकण्याचा प्रयत्न केला. आपली मर्यादा ओलांडत खेळ खेळणं कितपत योग्य आहे? हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. सदस्यांची वागणूक पाहून प्रेक्षकांबरोबरच ‘बिग बॉस मराठी’ बघणाऱ्या कलाकारांचाही राग अनावर झाला. या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरेत हिरो ठरला तो सूरज चव्हाण. सूरजने त्याचा गेम प्लॅन करत माणूसकीही राखली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कौतुक होत आहे. इतकंच काय तर चक्क रितेश देशमुखनेही त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘कलर्स मराठी’ वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये रितेश सूरजचं कौतुक करत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. या प्रोमोमध्ये रितेश त्याला असं म्हणतो की, “या आठडव्यात एका हिरोने जन्म घेतला आहे. ज्याने त्या संधीचं सोनं केलं आहे. त्याचं नाव आहे सुरज चव्हाण. तुम्ही एकट्याने या सर्वांचा हिंमतीने सामना केला”. यापुढे रितेश सूरजसाठी एक डायलॉग म्हणतो. यापुढे रितेश “भेडिया झुंड में आते हैं” असं म्हणत असतानाचं त्यापुढे सूरज “लेकीन शेर अकेला आता है” असं म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव घाबरले आणि…”, सूरज चव्हाणचं मराठी कलाकारांकडून भरभरुन कौतुक, म्हणाले, “तुझ्या हिंमतीपुढे…”

‘बिग बॉस मराठी ५’मधील सूरज चव्हाण हे नाव बरंच गाजतंय. सुरुवातीपासून सूरजचा खेळ प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेक कलाकारही त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच रितेशनेही त्याचं कौतुक केलं आहे.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “वैभव गद्दार, बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात…”, रितेश देशमुखने वैभवची घेतली शाळा, म्हणाला, “तशी जिगर लागते जेव्हा…”
 

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो… एक ‘भाऊचा धक्का’ संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार? याची ‘बिग बॉस’ प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे.    

Tags: bigg boss marathi 5riteish deshmukhSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Kolkata Rape Case, Rasika Vengurlekar, Saurabh Gokhale and Shreyas Talpade shared an angry post and said give death penalty

Kolkata Rape Case : “सगळं भान तिने जपायचं आणि तुम्ही...”, वाढत्या बलात्कार प्रकरणांवर कलाकार संतत्प म्हणाले, “हातात मेणबत्या पकडून...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.