शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुझी बोटं तोंडात घाल”, इरिनावर निक्कीने राग काढताच वैभव भडकला, भांडणात लाथेने भांडी उडवली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 23, 2024 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Nikki Tamboli and Vaibhav Chavan fight for Irina Rudakova in

Bigg Boss Marathi 5 मध्ये इरीनामुळे निक्की-वैभव यांच्यात राडा, टीम A मध्यये पडणार फुट

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या पहिल्या आठवड्यातच घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते. अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी एकीकडे सुरू झाली तर, आणखी दोन स्पर्धकांमध्ये खास नातं पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव व इरीना. वैभवने इरिनाचं वारंवार कौतुक केल्याचे आणि तिला जास्त महत्त्व दिल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र राहिल्यामुळे अनेकदा जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच या नवीन पर्वात वैभव-इरीना यांच्यातील नात्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘बिग बॉस’च्या घरात एकीकडे निक्की-अभिजीत यांची मैत्री अरबाजला खटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वैभव-इरीना यांच्यातील मैत्रीही आता काहींना सहन होत नाही असं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातली वैभव-इरीना यांची मैत्री निक्कीला सहन होत नाहीये असं दिसून येत आहे. याबद्दल ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच एक नवीन प्रोमो आला आहे, ज्यातून वैभव-इरीना यांच्यातील मैत्री निक्कीला पटत नसल्यामुळे वैभव व इरीना यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये वैभव-इरीना यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन या भांडणात निक्की लाथेने डिशही उडवताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पार पडला नवीन नॉमिनेशन टास्क, ‘या’ चार स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार? कोण जाणार घराबाहेर?  

या नवीन प्रोमोमध्ये निक्की इरीना विषयी अस म्हणते की, “बरं झालं ती नॉमिनेट झाली आहे. आता तर ती नॉमिनेटही झाली पाहिजे”. यावर वैभव “निक्की अति होतंय” असं म्हणतो. यावर निक्कीही “ती आधीपासून माझ्या टीममध्ये नव्हती. ती नंतर आली आहे”. यावर वैभव रागाने “असं फालतू काही ऐकून घेणार नाही”. असं म्हणतो. यावर निक्की “मी तुला नाही इरीना बोलली आहे” असं म्हणते. यावर वैभव इरीनाची बाजू घेत “तिला पण बोलायचं नाही. तुझ्या हाताला बोटं आहेत ती तोंडात घाल” असं म्हणत आहे. यानंतर निक्कीही “मी तुला या घरात माझा ‘पीए’ (सहाय्यक) म्हणून घेऊन आलेली नाही” असं म्हणते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीत यांच्यातील जवळीक अरबाजला खटकली, असुरक्षित वाटत असल्याचे दिलं कारण, म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

दरम्यान, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठीच्या थेट प्रक्रियेत इरीना, अभिजीत, आर्या व वैभव हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अशातच आता येतया आठवड्यात इरीना घराबाहेर जावी अशी इच्छा निक्कीने व्यक्त केल्यामुळे वैभवचा पारा चढला असून त्याच्यात व निक्कीमध्ये राडा झाला आहे. यामुळे ‘टीम ए’मध्ये फुट पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यातील हे वाद आता आणखी किती टोकाला जाणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.      

Tags: bigg boss marathi 5nikki tambolirina RudakovaVaibhav Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tejashri Pradhan angry post

"नराधमांना कधी शिक्षा मिळणार?", बलात्कार प्रकरणांवर तेजश्री प्रधानचा सवाल, म्हणाली, "आता समाजात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.