‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची चढाओढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांना मागे टाकून स्वत; पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात गुरुवारी निमिनेशन टास्क पार पडला असून या टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले. बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन टास्क रंगतो. निक्की कॅप्टन असल्याने ती या कार्याची संचालक असते. प्रत्येक सदस्याच्या गळ्यात एकेकाचे फोटो लटकवले जातात. प्रत्येक सदस्याला ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे त्याचा फोटो चुलीपर्यंत पोहोचून चुलीत टाकायचा असतो. प्रत्येक फेरीत एकाला नॉमिनेट करायचे असते.
बझर वाजल्यानंतर पिवळी रेष पार करुन जो स्पर्धक पहिल्यांदा चुलीजवळील बझर वाजवेल, त्याला फोटो चुलीत टाकण्याची संधी मिळेल. त्या स्पर्धकाला चुलीजवळील बझर वाजवून स्पर्धक नॉमिनेट करायचा असतो. पहिल्यांदाच बझर वाजल्यानंतर अभिजीतला दुखापत होते, त्याला मेडिकल रुममध्ये पाठवलं जातं. या फेरीत जान्हवी चुलीजवळील बझर वाजवते, ती तिच्या गळ्यातील आर्याचा फोटो चुलीत टाकते. आर्यावर खेळ कळत नाही, तिला बुद्धीचातुर्य नाही असं म्हणत ती आर्याला नॉमिनेट करते.
पुढे आर्या इरिनाचा फोटो चुलीत टाकते. आर्याही इरीनाला खेळ कळत नसल्याचे म्हणत आधीच्या खेळातील दाखले देते आणि तिचा फोटो चुलीत टाकून नॉमिनेट करते. आर्या अभिजीतशी वाद घालून तिनेच बझर दाबला असं सांगते आणि त्यामुळे अभिजीतची वैभवला नॉमिनेट करण्याची संधी हुकते. यानंतर घन:श्याम अभिजीतचा फोटो चुलीत टाकून नॉमिनेट करतो. यामध्ये त्यांच्यात अशी डील होते की, पॅडी जान्हवीला नॉमिनेट करणार नाही, अरबाज पॅडीला नॉमिनेट करणार नाही, अभिजीत वैभवला नॉमिनेट करणार आणि घन:श्याम अभिजीतला नॉमिनेट करणार.
मात्र या फेरीनंतर अरबाज शब्द बदलतो आणि तो पॅडी दादांना नॉमिनेट करण्याच्या रांगेत उभा राहतो. यावरुन दोघांमध्ये काही वेळ बाचाबाचीही होते. मात्र अरबाज पॅडी कांबळे यांची गंमत करत असल्याचे नंतर समजते. बझर वाजल्यानंतर वैभव अभिजीतला नॉमिनेट करतो आणि घन:श्याम अभिजीतला.
त्यामुळे आता येतया आठडव्याच्या शेवटी या घरातून कोणता स्पर्धक बाहेर पडणार आहे? याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. इरीना व वैभव यांचा घरातील खेळात सहभाग नसल्याने ते या घरातून बाहेर जातील की काय? अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता घरातून कोण बाहेर जाणार? हे पाहण्यायातही येतया वीकेंडची वाट पहावी लागणार आहे.