Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशा दोन टीम तयार झाल्या आहेत. असं असलं तरी, ‘टीम ए’मधील निक्की व ‘टीम बी’मधील अभिजीत सावंत या दोघांची चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टीम एकमेकांच्या विरोधात असले, एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी निक्की व अभिजीत यांची मैत्री काही कारणामुळे अरबाजला खटकत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. अरबाजचं नव्हे तर अभिजीतच्या टीम ‘बी’मधील सदस्यांनाही या मैत्रीवर आक्षेप असल्याचं दिसत आहे. याबद्दल टीम ‘बी’च्या स्पर्धकांनीनी अनेकदा उघडउघड भाष्य केलं आहे. अशातच नवीन प्रोमोमधूनही आता निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजलं सहन होत नसल्याचे दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. निक्की-अभिजीत यांच्यातील अरबाजबद्दलच्या संवादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये निक्की, अभिजीत व वर्षा उसगांवकर घरातील गार्डन एरियामध्ये बसलेले असताना अरबाजबद्दल बोलतात. यावेळी अभिजीत निक्कीशी अरबाजबद्दल असं म्हणतो की, “हे काय आहे. हे खूपच अति होत आहे. हे अगदी कॉलेजच्या मुलांसारखं होत आहे. कॉलेजमधली मुलं म्हणतात “देखा उसने भी मुझे देखा. तेरी बंदी भी स्माईल करती है. तसं झालं आहे”. यावर वर्षाताई निक्कीला “अरबाजला तुझ्याबद्दल असुरक्षितता वाटत आहे का?” असं विचारतात. यावर निक्की त्यांना असं म्हणते की, “नाही. तसं काही नाही. त्याचं म्हणणं हे आहे की, आम्ही (टीम ए) अभिजीतच्या विरुद्ध आहोत तर तू का बोलतेय? आणि सगळे अभिजीतविरुद्ध आहेत कारण अभिजीतला मला fevour करत नाही. मग तू का त्याच्याबरोबर बोलते”.
दरम्यान, निक्की-अभिजीतच्या मैत्रीमुळे आता निक्की-अरबाज दुरावणार का? असा प्रश्न पडला आहे. तसंच अभिजीतही त्याच्या टीमपासून वेगळा होणार? का? आणि अभिजीत-निक्कीची मैत्री अरबाजसह आणखी कोणाला खटकणार का? त्याचबरोबर या मैत्रीमुळे घरातील वातावरण कसं राहणार? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.