शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “ये शेंबडी, चल हट”, निक्की-जान्हवीची घरात पुन्हा दादागिरी, दोघींचा तोच अवतार पाहून प्रेक्षक म्हणाले, “यांचा माज…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 12:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo daily update truth of the contestants will judged in the house

Bigg Boss Marathi 5 मध्ये होणार सत्याचा पंचनामा, नवीन टास्कदरम्यान स्पर्धक एकमेकांना भिडणार? कॉन कुणावर पडणार भारी

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसऱ्या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’ अगदी रंजक ठरला. तिसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने मोठा धक्का दिला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडले. निखिल दामले व योगिता चव्हाण यांचा शोमधील प्रवास संपला. हा प्रेक्षकांसाठीही धक्का होता. तर हे दोन्ही सदस्य टीम B मधील होते. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण टीमसाठीही धक्काच होता. आता चौथ्या आठवड्यात प्रत्येक जण स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. टास्क म्हटलं की, एकमेकांवर आरोप करणं, भांडण होणं हे आपसूकच येतं. आताही असंच काहीसं घडणार आहे. ‘बिग बॉस’ दिलेल्या नव्या टास्कमध्ये जान्हवी, निक्की, अंकिता आणि टीम B मधील इतर सदस्यांबरोबर भांडणं होताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘कलर्स मराठी’ वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये सदस्यांची भांडणं आणि टास्क जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ ‘सत्याचा पंचनामा’ होणार असल्याचं सांगत आहेत. यात ‘बिग बॉस’ जान्हवीला आपण निक्की यांच्या सावली आहात, आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही असं म्हणतात. यावर टीम B आम्ही सहमत आहोत असं म्हणते. अंकिता ‘बिग बॉस’च्या या वक्तव्याला संमती दर्शवताच निक्की तिला ‘शेंबडी’ असं म्हणते. तर निक्की आर्याला ‘बालिश बुद्धी’ म्हणत तिच्या सत्याचा पंचनामा करते. तसंच या प्रोमोमध्ये टीम A व टीम B मध्ये चांगलीच जुंपली असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रोमोच्या शेवटी जान्हवी तिचा रागही व्यक्त करतानाचे पाहायला मिळत आहे.  

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Chhaava Movie Teaser : ‘छावा’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, विकी कौशलने जिंकलं प्रेक्षकांचं मन, काही मिनिटांतच हजारो व्ह्युज

या नवीन टास्कमधील राडे पाहून प्रेक्षकही निक्की-जान्हवीवर संतापले आहेत. “निक्कीचा ग्रुप सारा झटला पण सुरजभाईचा रुबाब न्हाय हाटला”, “निव्वळ थिल्लर पोरगी जान्हवी”, “आता तर निकीच्या आवाजाने पण इरिटेट होत आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी या प्रोमोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आजच्या भागात कोणता स्पर्धक कोणत्या स्पर्धकाला भारी पडणार? आणि या सत्याच्या पंचनामामध्ये कुणाकुणाचा पंचनामा होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी आजच्या भागाची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. कालचा ‘भाऊचा धक्का’ अनेक कारणांमुळे गाजला. या भागात प्रेक्षकांसह सदस्यांनादेखील मोठे धक्के मिळाले आणि ते धक्के म्हणजे निखिल व योगिता यांच्या एलिमिनेशनचे. कालच्या भागात दोन स्पर्धकांनी या घराचा निरोप घेतला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने सुसंस्कृत म्हटलं पण सूरजने ‘त्या’ कृतीमधून केलं सिद्ध, अभिनेत्रीने राखी बांधताच पाया पडला अन्…; महाराष्ट्राला कौतुक

दरम्यान, ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. तसंच या घरात एक नवीन खोलीही उघडण्यात आली. यात घरातील स्पर्धकांनी एकमेकांविषयीची केलेली चुगली ऐकवून दाखवण्यात आली. यामुळे सर्वांना एकमेकांविषयीचे खरे रंग दिसले.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Celina Jaitly Post on harrasment

"त्याने प्रायव्हेट पार्ट दाखवले, अश्लील वर्तन करत…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझ्या कपड्यांमुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.