Jahnavi Killekar Son Video : मराठी मनोरंजन विश्वातील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या कुटुंबाबरोबरचं खास बॉण्डिंग नेहमीच चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. चाहत्यांनाही या कलाकारांच्या आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. बरेच कलाकार आहेत जे सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या लेकाबरोबरच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने तिचा लेक ईशानबरोबरचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जान्हवी ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. उत्तम खेळ खेळत जान्हवीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिच्या खेळावरुन काहीजण तिचं कौतुक करताना दिसले तर काहींना तिचा हा खेळ खटकला. खेळाबरोबरच जान्हवीचा ग्लॅमरस लूकही चर्चेचा विषय ठरला. जान्हवीला खऱ्या आयुष्यात आठ वर्षाच्या चिमुकल्याची आई आहे. जान्हवीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही चाहत्यांसह शेअर केलं नाही. असं असलं तरी ती नेहमीच सोशल मीडियावरुन कुटुंबाबाबत काही ना काही शेअर करत असते.
आणखी वाचा –स्वतःच्या वाढदिवसाला प्रिन्स नरुलाने ठेवलं लेकीचं नाव, अगदी आहे युनिक, फोटोही केले शेअर
सासरच्या मंडळींसह जान्हवी बरेचदा दिसते. जान्हवीचं लग्न झालं असून तिला आठ वर्षांचा मुलगादेखील आहे. किरण किल्लेकर असं तिच्या पतीचं नाव आहे. तर ईशान असं तिच्या मुलाचं नाव आहे. ईशानसाठी ती अनेकदा पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करत असते. आता आईला साडी नेसायला ईशान मदत करतानाचा एक व्हिडीओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. “जेव्हा मुलगा आईला साडी नेसायला मदत करतो, तेव्हा आई अजुनच सुंदर दिसायला लागते”, असं कॅप्शन देत जान्हवीने ही पोस्ट शेअर केली आहे.
जान्हवीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ईशान जान्हवीच्या मिऱ्या सरळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आई-मुलाचं खास बॉण्ड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत जान्हवीच्या मुलाचं ईशानचं कौतुक केलं आहे.