‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार आणि ‘रंग माझा वेगळा फेम अभिनेता अंबर गणपुळे यांनी एप्रिल महिन्यात साखरपूडा करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. कारण, ही जोडी कधीच कलाविश्वात एकत्र पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे हे दोघे कसे एकत्र आले, ह्यांची प्रेमकहाणी काय असेल, याबद्दल चाहते विचारात पडले. (९ एप्रिल) अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत शिवानीने “अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे” असं म्हटलं होतं. (Shivani Sonar Bride To Be Party and Amber Ganpule Groom To Be Party)
अशातच आता या दोघांच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. शिवानी व अंबर यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून दोघांची Bride To Be Party आणि Groom To Be Party साजरी केली आणि याचे काही खास क्षण शिवानी व अंबर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. यावेळी शिवानीने खास असा लुक केल्याचेही पाहायला मिळाले. शिवानीने पांढरा व सोनेरी रंगाचे मिश्रण असलेला वेस्टर्न स्टईल ड्रेस परिधान केला होता. तर अंबरने निळ्या रंगाचा शर्ट व त्यावर काळी पँट असा खास लुक केला होता.
आणखी वाचा – 25 November Horoscope : कर्क राशीसह ‘या’ राशींना सोमवारी होणार आर्थिक लाभ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका चांगलीच गाजली होती. साडे तीन वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या वर्षी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुले हा चांगलाच लोकप्रिय झाला. तर अभिनेत्री शिवानी सोनार ही राजा राणीची गं जोडी या मालिकेतून लोकप्रिय झाली. यानंतर ती ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतही मुख्य भूमिकेत झळकली होती. सध्या ती सोनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडलं व्याहीभोजन, फोटो व्हायरल
तर अंबरही कलर्स मराठीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याच्या ‘दुर्गा’ या मालिकेने नुकताच निरोप घेतला. दरम्यान, शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. अशातच आता त्यांची Bride To Be Party आणि Groom To Be Party झाली आहे. त्यामुळे दोघांवर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे. आता हे दोघं कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.