Prince Narula And Yuvika Chaudhary Daughter Name : प्रिन्स नरुला व युविका चौधरीने काही दिवसांपूर्वीच आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. २०२४ मध्ये अभिनेत्री युविका चौधरीने लग्नाच्या सहा वर्षानंतर मुलीला जन्म दिला. प्रिन्स नरुला आणि युविका यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे आणि आई-वडील झाल्यानंतर दोघेही खूप आनंदी आहेत. आज, २४ नोव्हेंबर रोजी, ‘बिग बॉस’ विजेता, प्रिन्स नरुलाने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आणि या खास दिवशी त्याने आपल्या लेकीचं नावही सांगितलं. प्रिन्स नरुलाने मुलीबरोबरचे खास फोटो त्याच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो लेकीला जवळ घेत तिचे लाड करताना दिसत आहे.
वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याच्या भावना मांडल्या आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, ‘दिल तू जान तू जब तक में जीना मेरे जीने दी वजाह तू’ वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरा बच्चू पापा, रोडीजला ३० मिनिटांसाठी सोडून १४ तासांचा रस्ता प्रवास आणि तीन तासांची फ्लाईटने प्रवास करुन आल्यावर तुला पाहताच मी सर्व थकवा विसरलो. तू बाबांचा जीव आहेस”. युविका आणि प्रिन्सने त्यांच्या लेकीला एक सुंदर नाव दिले आहे, जे प्रिन्सने त्याच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये जगासमोर उघड केले आहे. प्रिन्सने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “पप्पापेक्षा जास्त अकेलिनवर कोणीही प्रेम करत नाही. मी नेहमी तुझे रक्षण करीन आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल किंवा माझ्या आयुष्यात आनंद आणल्याबद्दल धन्यवाद”.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : फोन कॉलमुळे अर्जुनचा सायलीवर संशय, गैरसमजामुळे उडालाय मोठा गोंधळ, ही चूक महागात पडणार का?
प्रिन्स आणि युविका यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘अकेलिन’ असे ठेवले आहे. हे एक शीख नाव आहे. या नावाचा अर्थ ‘एकामध्ये शोषून घेतलेला’ असा आहे. याशिवाय, अकलीनचे अनेक अर्थ आहेत, ज्यापैकी काही समजूतदार, ज्ञानी, अभ्यासू, स्वतंत्र, निर्भय, तपासशील, पुरावे देणारे, व्यावहारिक आध्यात्मिक, बुद्धिमान, राखीव, रहस्यमय आणि अंतर्ज्ञानी असे आहेत. प्रिन्सचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि त्याच्या मुलीच्या नावाचे कौतुक करत आहेत.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची माफी मागण्यास अनुष्काचा नकार, ही चूक महागात पडणार का?, पुढे काय होणार?
प्रिन्स नरुलाने शेअर केलेला सध्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये प्रिन्सने युविकाने बाळाच्या प्रसूतीची बातमी त्याच्यापासून लपवून ठेवली असल्याचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिन्स असे बोलताना दिसत आहे की, “युविका तिच्या माहेरच्या घरी आहे आणि बराच वेळ होऊनही घरी येण्यास तयार नाही”. प्रिन्स नरुला म्हणाला, “मुलगी अजून आलेली नाही. ती म्हणते की मी मम्मीबरोबर ठीक आहे. पण असे कसे चालेल, आम्ही ठरवले होते की बाळाची प्रसूती झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून थेट आमच्या घरी येऊ. सुरुवातीला मला बाळाच्या प्रसूतीबद्दल माहिती नव्हती आणि मला दुसऱ्याकडून कळले की हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे”.