मराठी मनोरंजनविश्वात लगीनघाईला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण पार पडलं. तर, ‘शिवा’ फेम अभिनेता शाल्वच्या लग्नाआधीह्या विधींनाही सुरुवात झाली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्याच्या घरी सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका फेम अभिनेता अभिषेक गांवकर. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेकने नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला होता. त्यानंतर काल (२४ नोव्हेंबर) रोजी या दोघांचा हळदी सोहळाही पार पडला आहे. (Sonali Gurav Haldi Ceremony)
‘बिग बॉस मराठी ५’ फेम अंकिता वालावलकरने या हळदी सोहळ्याला हजेरी लावली होती. या हळदी सोहळ्याचा खास व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. गुलाबाची कळी हळदीने माखली हे गाणं लावत अंकिताने अभिषेक व त्याची होणारी पत्नी सोनाली गुरव यांच्या हळदीच्या व्हिडीओ शेअर केला आहे. अभिषेकची होणारी पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे. त्यामुळे अंकिता वालावलकरने आपल्या मैत्रीणीच्या हळदी सोहळ्याला खास उपस्थिती लावली.
‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेता अभिषेक गांवकर सर्वत्र चर्चेत आला. या मालिकेमध्ये अभिषेक गावकरने ‘श्रीनू’ ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या श्रीनू फेम अभिषेकने तो लवकरच लग्न करेल असं सांगितलं होतं आणि आज अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडलं व्याहीभोजन, फोटो व्हायरल
दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेकने नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला होता. त्याची होणारी पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र बरेच व्हायरल झाले होते. यानंतर ही जोडी लग्न केव्हा करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आता या दोघांच्या लग्नाच्याकडे त्यांच्या अनेक चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.