Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून अनेक कलाकार मंडळी ‘बिग बॉस’ मधील कलाकारांच्या न पटलेल्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतात. सोशल मीडिया या माध्यमातून ही कलाकार मंडळी व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकदा स्पर्धकांच्या न पटलेल्या गोष्टींवर अनेक कलाकारांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात एका स्पर्धकाने केलेलं भाष्य लक्षवेधी ठरलं. या स्पर्धकाने केलेल्या भाष्यावरुन त्या स्पर्धकाला प्रेक्षकांनी, कलाकार मंडळींनी बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. ही स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर.
जान्हवी किल्लेकरने सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान अभिनेते पॅडी कांबळे यांचा केलेला अपमान अनेकांना खटकला. सुरुवातीला निक्कीने पॅडीला जोकर असं म्हटलं आणि त्यानंतर पॅडी कांबळेच्या सिने सृष्टीतील कारकिर्दीवरुन जान्हवीने त्याचा घोर अपमान केला. ही गोष्ट अनेकांना खटकली जान्हवीला ही या गोष्टीचं नंतर वाईट वाटलं आणि कालच्या एपिसोडमध्ये जान्हवीने याबाबत पॅडीची माफी मागितली. जान्हवीने माफी मागताच अनेक कलाकारांनी यावरही भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. जान्हवीने माफी मागितली असली तरी डोळ्यातून एकही अश्रु आले नाहीत नक्की ही माफी तिने मनोभावेच मागितली ना की हा सुद्धा टीआरपीचा एक भाग आहे असं अनेकांनी म्हटलं.
तर अनेक कलाकार मंडळींनी ही यावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं. जान्हवी ओवर एक्टिंग करते असं अनेकांचे यापूर्वीही म्हणणं होतं आणि आता पुन्हा एकदा जान्हवीने पॅडीची माफी मागून केलेली ओवर एक्टिंग अनेकांना खटकली. “आधी दुसऱ्यांच्या जीवावर उडायचं मध्येच कोंबडी सारखं फडफडायचं मग गटार उघडून बडबडायचं आणि माती खाल्ली आहे हे कळालं की मुळूमुळू रडायचं, कधी जाणार ही जान्हवी”, असं उत्कर्ष शिंदे याने म्हणत स्टोरी पोस्ट केली आहे. तर “डोळ्यात ग्लिसरीन तेवढं घ्यायचं राहील”, असं सौरभ चौघुलेने म्हटलं.
आणखी वाचा – निक्की झाली Bigg Boss Marathi च्या घराची नवी कॅप्टन, अरबाजनेच तिच्याकडे जबाबदारी सोपवली कारण…; मोठा ट्विस्ट
तर “वा जान्हवी किल्लेकर. ओव्हर ऍक्टिंग छान आहे. लवकर बाहेर ये. पुरस्कार वाट बघतोय. तू कीव येण्याजोगी आहेस”, जय दुधानेने अशी पोस्ट करत टोला लगावला.”आज काय घडले?, आजचा एपिसोड बघून खूप वाईट वाटलं. काल केलेल्या विधानावरुन खूप भरुन आलं. मी खूप रडले, पण माझ्या डोळ्यातून टिपूसही नाही आला. असं का बरं?”, अशी पोस्ट करत सुरेखा यांनी जान्हवीला टोला लगावला आहे.