Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की केव्हा काय होईल याचा थांग पत्ताही नसतो. क्षणात सुरळीत चालणाऱ्या गोष्टी क्षणार्धात बिघडतात. स्पर्धकांचे वागणं, बोलणं, चालणं हे अनेकांना खटकताना दिसत. स्पर्धक मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात मात्र वेळोवेळी ‘बिग बॉस’ त्यांचे कानही धरताना दिसतात. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात फक्त कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी काही मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
वादग्रस्त शो पैकी एक असलेल्या या शोची ओळख असून हा शो विशेष चर्चेत असतो. यंदाच्या या नव्या पर्वात नुकत्याच झालेल्या सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान साऱ्यांनाच एक धक्का मिळाला. यंदाच्या या आठवड्याचं कॅप्टनपद हे अरबाज पटेलला मिळालं होतं. अरबाजला कॅप्टनपद मिळाल्यानंतर तो काहीसा बदललेलाही दिसला असं घरातील स्पर्धकांनी मतही व्यक्त केलं. अरबाज कॅप्टन असताना सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून घरातील सर्व वस्तू या त्यांना विकत घ्यावा लागतील शिवाय बेड व वॉशरूमही त्यांना वापरता येणार नाही यासाठीही त्यांना किंमत मोजावी लागेल असं सांगितलं.
आणि ही किंमत ‘बिग बॉस’ यांनी वाढवून ठेवली होती त्यामुळे सर्वांसमोर खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला. यावर तोडगा म्हणून ‘बिग बॉस’ यांनी अरबाज पटेलला एका रूम मध्ये बोलावलं आणि त्याच्यासमोर एक डिलेमा ठेवला की दोन लाख रुपयाची करन्सी किंवा कॅप्टनपद यापैकी काहीही एक स्वीकाराव आणि करन्सी घेतली तर ते कॅप्टनपद इतर कोणत्याही स्पर्धकाला त्यांने दान करावं. अरबाजसमोर खूप मोठा प्रश्न होता जर कॅप्टनशी गेली तर आपली इम्युनिटी ही जाईल हा टांगती तलवार त्याच्यावर होती अशावेळी अरबाजने कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आणि घरातल्यांचा विचार करुन त्याने करन्सी घेण्याचा विचार केला.
त्यावेळी अरबाज कॅप्टनपद सोडतो आणि वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून निक्कीला कॅप्टन्सी देतो. तो २ लाख बीबी करन्सीची निवड करतो. अशाप्रकारे निक्की घराची नवीन कॅप्टन ठरते आणि तिला इम्युनिटीही मिळते. अरबाजने निक्कीला कॅप्टन्सी देऊन तिला तिच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं.