Satvya Mulichi Satavi Mulgi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेते गेले काही दिवस एकामागून एक अनेक वळणं येत आहेत. गेले काही दिवस मालिकेत नेत्राच्या गरोदरपणाचे कथानक पाहायला मिळत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकातील एखादे वळण प्रेक्षकांना आवडले तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात. पण मालिकेतील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच ‘सातव्या मुलीची…’ प्रेक्षकांनी मालिकेतील नवीन ट्विस्टवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi audienc reaction)
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो आला होता. या प्रोमोमध्ये नेत्राला प्रसुतीकळा सुररु झाल्या असून अद्वैत तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्या कारमधून नेत असल्याचे पाहायला मिळाले. नेत्राच्या काळजीने अद्वैत अगदी कासावीस होतो आणि देवीआईला हाक मारतो. तो भर पावसात हातगाडीवरुन तिला घेऊन जाताना दाखवले आहे, तेवढ्यात त्या गाडीचे एक चाक निखळते. अद्वैत मदतीसाठी हाक मारतो, तेव्हा एक महिला त्याच्या मदतीला धावून आली आणि ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती सारंगधर आहे. यापुढे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, नेत्रा देवीच्या मंदिरात जुळ्यांना जन्म देते.
आणखी वाचा –
मालिकेतील हा नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला असून काही प्रेक्षकांना मात्र हा नवीन ट्विस्ट आणि हा नवीन प्रोमो आवडला नसल्याचे म्हटलं आहे. नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये “या मालिकेने अंधश्रध्देची सीमा गाठली आहे” “लाज वाटली पाहिजे अशी मालिका दाखविणाऱ्या त्या नालायक लोकांना आपण काय दाखवतोय”, “हे असलं काहीतरी दाखवायचं सुनेवर सासूचे अत्याचार, सासऱ्याचे कांड, टीआरपीच्या नावाखाली चार-चार लग्न जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे”. “या मालिकांमुळे समाजातील महिला पुर्णतः मूर्ख बनत चालल्या आहेत”, “हे असलं बघूनच आपला समाज बिघडत चालला आहे”, “या असल्या भंगार मालिका दाखवायच्या बंद करा” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी वाचा –
गेल्या काही दिवसांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मालिकेत विरोचकाच्या अंतावर या मालिकेचे कथानक अवलंबून होते. त्यामुळे आता शेवटी विरोचकाचा अंत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मालिकेत देवी आईच्या भूमिकेत अदिती सारंगधर दिसणार आहे. अदिती सारंगधर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आदितीने या आधी ‘लक्ष्य’ मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.