Bigg Boss Marathi Update: ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही बाकी सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. गेल्या आठवड्यात सुरज, पॅडी हे स्पर्धक शांत होते. मात्र यांनी बोलावे असं रितेशने ‘भाऊचा धक्का’मध्ये त्यांना सांगितलं आहे. अशातच सूरजने त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. (Bigg Boss Marathi Suraj and Janhavi Fight)
‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी व सूरज यांच्यात बाचाबाची झाली आणि यात सूरज व जान्हवी दोघांना पुरुन उरले. यावेळी सूरज कचऱ्याच्या डब्ब्यात कचरा टाकायला जातो, त्याचवेळी जान्हवीसुद्धा कचरा टाकायला जाते. पण ती कचरा टाकणार इतक्यात सूरज कचऱ्याच्या डब्ब्याचे झाकण लावतो. याचाच जान्हवीला राग येतो आणि त्यांच्यात वाद होतो. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण होते. यात जान्हवी सूरजच्या वागण्याच्या पध्दतीरुन बोलते.
या भांडणादरम्यान, जान्हवी त्याला असं म्हणते की, “तुला काही मॅनर्स आहेत की नाही. अगदी बेशिस्त मुलगा आहेस तू. ही फालतूगिरी इथे नाही दाखवायची. घरी जाऊन दाखव. माझ्या डोळ्यासमोर थांबू नको. इथून निघ”. यानंतर ती अरबाजला घडलेला प्रसंग सांगताना सूरजचा ‘फालतू मुलगा’ आहे असल्याचा उल्लेख करते. पुढे ती त्याला असं म्हणते की, “असल्या फालतू मुद्द्यांवरुन माझ्याशी वाद नाही घालायचे” असं रागात म्हणते. यानंतर सूरज जान्हवीला “ए चल फुट” असं म्हणतो.
यानंतर जान्हवीही त्याला “ए तू निघ, जास्त शहाणपणा करु नको” असं म्हणते. पुढे “तुला या घराबाहेर कसं काढायचं ते आम्ही बघू” असंही त्याला सुनावते. गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. दरम्यान, २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना नुकताच एक आठवडा सुरु झाला असून या पर्वाची सुरुवात भांडण व वादांनी झाली. आता अजून पुढे घरात काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.