शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोणतीही अपेक्षा करणं चुकीचं आणि…”, अंकिताबरोबरच्या नात्यावर डीपीचं स्पष्टीकरण, म्हणाला, “बहीण मानंल आहे आता…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame DP aka Dhananjay Powar commented on his relationship with Ankita Walawalkar in Itsmajja interview

Bigg Boss Marathi 5 फेम धनंजय पोवार यांनी अंकिता वालावलकरबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे

Bigg Boss Marathi 5 : काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु होती. हे पर्व सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट बघायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाईदेखील पाहायला मिळाली. भांडण, हाणामारी, शाब्दिक वादावादी यामुळे या कार्यक्रमाला अधिक रंगत चढली. या घरातली वादावादी जितकी चर्चेत आली, तितकीच या घरातील नातीही गाजली. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमाच्या नात्यांसह बहीण-भाऊ हे नातेही फुलले. यापैकी एक नाते म्हणजे डीपी अर्थात धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर. हे दोघे घरात येण्याच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. मात्र घरात येताच दोघे भाऊ-बहीण बनले. (Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar)

‘बिग बॉस’च्या घरात खेळाच्या सुरुवातीपासून दोन गट पडलेले पाहायला मिळाले. त्यामध्ये अभिजीत सावंत, सुरज चव्हाण, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर ही मंडळी टीम बी मध्ये होती. मात्र या ग्रुपमध्येसुद्धा बरेचदा खटके उडताना पाहायला मिळाले. कधी अभिजीतवरुन ग्रुपमध्ये भांडणं झाली. तसेच अनेकदा डीपी यांनाही या ग्रुपमध्ये एकटे असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र खेळण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे दोघांच्या नात्यात अनेकदा मतभेदही झाले. अशातच या दोघांच्या नात्यावर डीपी यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे विजेते होताच सूरज-अभिजीत गणपती चरणी, सिद्धीविनायकाचे घेतलं दर्शन, ‘त्या’ कृतीचे होतंय कौतुक

‘बिग बॉस’ संपताच डीपी यांनी इट्स मज्जासही खास संवाद साधला. यात त्यांनी असं म्हटलं की, “घराबाहेर आल्यानंतर आमचं बोलणं वगैरे झालं आहे. पण आम्ही अजून त्या मुद्द्यांवर चर्चा केलेली नाही. मला तिच्याकडून जाब किंवा उत्तर नको आहे. मी बहिणीचं नातं मानलं आहे. मी तिच्याकडून त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे किंवा माझ्याकडून तिने अपेक्षा करणेही चुकीचे आहे. पण मी अपेक्षा केली आणि तिने केली की नाही हे ‘बिग बॉस’चे भाग पाहिल्यानंतर माझ्या पाठीमागे काय घडलं हे बघितल्यानंतर समजेल”.

आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मला तिच्याकडून उत्तरांची गरज नाही. तसंच तिने सांगितलं आहे की, मला ती एखादा भाग बघून तुम्ही तेव्हा माझ्याबद्दल असं का म्हणाला होतात हे विचारणार आहे आणि मला त्याचे स्पष्टीकरण हवं आहे. त्यामुळे आमच्यात नाते अगदीच चांगलं आहे आणि ते हळूहळू अजून विकसित होईल किंवा माझ्याकडून तरी प्रयत्न राहील. आता तिने कसं स्वीकारायचं हा तिचा प्रश्न आहे”. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी सीजन ५ ‘चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि बारामतीचा टिक टॉक स्टार सुरज चव्हाण हा महाविजेता ठरला. 

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarwith Ankita Walawalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Dhananjay Powar Friendship Video

Video : मैत्री असावी तर अशी! घरी पोहोचताच डीपीने मित्रांना भरवलं जेवण, साधेपणाचं सर्वत्र कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.