‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यही चर्चेत आले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडणं पाहायला मिळाली. पण त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. धनंजय हे आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. सोशल मीडियावर ते आपले अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. (dhananjay powar daughter funny video)
स्वत:बरोबरच ते त्यांच्या कुटुंबीय व मित्र-मंडळींबरोबरचेही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर लेकीचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी त्यांच्याकडे पैसे मागत आहे. बाप-लेकींमधील हे मजेशीर क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत आणि हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. बाप-लेकीचं नातं हे कायमच खास असतं आणि त्याचीच झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. तशीच बाप-लेकींमधील थोडी मजामस्तीही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
धनंजय पोवार यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी शाळेच्या कपड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यात ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहते त्यावर धनंजय तिला “काय झालं?” असं विचारतात. यावर मुलगी हाताने खुणावत वडिलांकडे पैसे मागते. यावर धनंजय तिला “का?” असं विचारतात. त्यानंतर मुलगी पुन्हा हाताने डान्सची प्रतिक्रिया करत “गॅदरिंग” असं म्हणते. त्यावर धनंजय तिला “आवर” असं म्हणतात. त्यानंतर मुलगी पुन्हा त्यांना “आवरलं की… आणि किती आवरु” असं म्हणते.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla मध्ये लीलाच्या जुन्या मित्राची एन्ट्री, लीला-एजेच्या प्रेमाला नवं वळण, मोठा ट्विस्ट
दरम्यान, धनंजय पोवार यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “जसा पप्पा तशी पोरगी”, “द्या की तिला दहा रुपये”, “अगदी बापावर गेली आहे” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. इरीनानेही या हसण्याचे ईमोजी पोस्ट करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.