सईद जाफरी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेते आहेत. त्यांनी आजवर १५० हून अधिक ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय चित्रपट केले होते. ब्रिटीश चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारण्याव्यतिरिक्त, सईद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या व्यक्तींपैकी एक होते. सईद यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या. ‘शतरंज के खिलाडी’, ‘चश्मे बद्दूर’, ‘राम तेरी गंगा मैली’ आणि ‘मेहंदी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी यशाचं शिखर गाठलं. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य फारसं चांगलं नव्हतं. सईद जाफरी यांच्या कारकिर्दीची आणि चित्रपटांची तितकी चर्चा झाली नाही तितकी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा झाली. (saeed jaffrey news)
सईद जाफरी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि नंतर एका परदेशी महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र जेव्हा त्यांची पहिली पत्नी प्रसिद्ध व लोकप्रिय झाली, तेव्हा सईद जाफरी यांना त्यांची चूक समजली आणि मग त्यांना आयुष्यभर पश्चाताप होत राहिला. सईद जाफरी व मधुर (पहिली पत्नी) बहादूर एकत्र काम करताना प्रेमात पडले. १९५६ मध्ये सईद जाफरी यांनी मधुरच्या वडिलांना त्यांच्या मुलीचा हात मागितला, पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी सईद जाफरी ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते. त्यांनी लगेच नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अमेरिकेला गेले. मग १९५८ मध्ये तेथे त्यांचे लग्न झाले. मात्र काही वर्षांनी त्यांच्यात भांडणे सुरु झाली.

सईद जाफरी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी इंग्रजीत बोलत असत, तर त्यांची पत्नी शुद्ध हिंदीत बोलत असे. सईद जाफरी यांना ही पद्धत आवडली नाही. यामुळे त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि त्यानंतर १९६६ मध्ये पत्नी मधुरला घटस्फोट दिला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सईद जाफरी यांनी विदेशी महिला जेनिफरला डेट करण्यास सुरुवात केली आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. असे म्हटले जाते की, दोघेही जवळपास १० वर्षे एकत्र राहिले आणि नंतर लग्न केले. पण लग्नाच्या काही काळानंतर सईद यांना समजले की, त्यांची दुसरी पत्नी त्यांची काळजी करत नाही. ती फक्त स्वत:चा विचार करत होती. त्यानंतर त्यांना मधुरची कमी जाणवू लागली.

घटस्फोटानंतर मधुर यांनी मुलांना भारतात आपल्या आईकडे पाठवलं आणि स्वतः कुकिंगमध्ये करिअर केलं. मधुर यांनीसुद्धा दुसरं लग्न केलं. एक वेळ अशीही आली होती कि सईद यांना त्यांच्या मुलांना भेटायचं होतं पण मधुर यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे सईद जाफरी पहिल्या पत्नीला आणि मुलांना पुन्हा आपल्या आयुष्यात आणू शकले नाहीत.