झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत नवीन वर्षात नवीन धमाके होणार आहेत, ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीने सुरू झाली आहे. एजेला अखेर जाणीव झाली आहे की त्याचं लीलावर प्रेम आहे. लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवायची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते. लीला तिचं न ऐकता स्वतःच्या पद्धतीने चहा बनवून एजेला देते. एजे चहा पिताना लीला म्हणते, “तुम्ही माझं हृदय जिंकलंय, आता माझ्यासाठी काहीतरी खास करा”. पुढे लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात. (navri mile hitlerla serial update)
एजे आणि सुनाही पार्टीसाठी तयार होतात. सर्वजण लीलाला उशिर होणार हे गृहीत धरतात. एजे सर्वांना सांगतो की, जरी लीला उशीरा आली तरी, ती परफेक्ट दिसेल. लाइट्स गेल्यावर लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉटलाइटमध्ये येते. सर्वजण तिच्या लूकवर हसू लागतात. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला हटके पद्धतीने प्रपोज करणार आहे असं दिसत आहे. अशातच आता यात आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे लीलाच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे. त्यामुळे एकीकडे एजे लीलावरचे प्रेम जाहीर करणार आहे, मात्र दुसरीकडे तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.
मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एजेची आई त्याला असं म्हणते की, “तू लीलाच्या प्रेमात पडला आहेस आणि तिच्यासाठीच हे सगळं करत आहेस? बरोबर आहे ना?”. त्यावर एजेही आईला असं म्हणतो की, “माझं प्रेम व्यक्त करण्याची हीच पद्धत आहे. मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. हीच माझी स्टाइल आहे. तिच्यासाठी मी एक पूरण दिवस प्लॅन केला आहे”. त्यानंतर पुढे लीला एजेला असं म्हणते की, “मी माझ्या शाळेतल्या एका जुन्या मित्राला भेटणार आहे. ज्याचं नाव मन्या आहे”. पुढे एज लीला व तिची मित्राला एका हॉटेलमध्ये एकत्र बघतात.
त्यामुळे आता लीलाच्या आयुष्यातील हा नवीन मित्र मन्या नेमका कोण आहे? त्याच्या येण्याने आता लीला-एजेच्या आयुष्यात काय नवं वळण येणार? या मित्रामुळे दोघांच्या नात्यात काय बदल होणार का? आणि एजेना वाटत असलेले लीलाविषयीचे प्रेम ते व्यक्त करु शकणार का? हे लवकरच पाहायला मिळेल.