अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इतकंच नव्हे तर पदार्पणातच ती भल्याभल्या स्टारकिड्सना तगडी टक्कर देत आहे. आगामी ‘आझाद’ या चित्रपटातून राशाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकलं आहे. या चित्रपटातील राशाचं पहिलं आयटम साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘ऊई अम्मा’ असं या गाण्याचं नाव असून प्रदर्शित झाल्या झाल्या ते सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होऊ लागलं आहे. इन्स्टाग्रामवर राशाच्या डान्सचे रील्स व्हायरल होऊ लागले आहेत. अशातच आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सेटवर अभ्यास करताना पाहायला मिळत आहे. (raveena tandon daughter rasha)
राशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती १२वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती चित्रपटाच्या सेटवर असून एकीकडे मेकअपमॅन तिचा मेकअप करत आहे, तर हेअर स्टायलिस्ट तिचे केस विंचरत आहे. पण आरशासमोर बसलेल्या राशाचे संपूर्ण लक्ष तिच्या पुस्तकांकडे आहे आणि ती अभ्यास करत आहे. या व्हिडीओमध्ये कोणीतरी तिला विचारत आहे की, “राशा, तू तुझ्या ओळींसाठी तयार आहेस का?” मग ती विचारते, “काय करत आहेस?”. हे ऐकून ती हसली आणि म्हणाली की, “अभ्यास करते आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla मध्ये लीलाच्या जुन्या मित्राची एन्ट्री, लीला-एजेच्या प्रेमाला नवं वळण, मोठा ट्विस्ट
पुढे ती विचारते “अभ्यास?, शॉटला जाण्यापूर्वी?” यावर राशा म्हणते, “माझ्या बोर्डाची परीक्षेसाठी आता फक्त १० दिवस उरले आहेत, त्यामुळे मी भूगोलाचा अभ्यास करत आहे”. मात्र राशाच्या या व्हिडीओवर अनेकांनी नकरात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि ती या व्हिडीओमध्ये अभिनय करत असल्याचे म्हटलं आहे. “याला प्रेमाने दिखावा म्हणतात”, “अभ्यासाचा पण अभिनय करत आहे मुलगी”, “ही १२वी मध्ये नाही तर हीचं १५वी मध्ये असल्याचे वाटत आहे”, “जरी ती परीक्षेत नापास झाली तरी ती कोणत्याही पदवीशिवाय करोडोंची कमाई करेल”.
या प्रतिक्रियांसह अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तिला मेहनती व अभ्यासू असं म्हटलं आहे. दरम्यान, राशाचा ‘आझाद’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून राशाबरोबरच अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. यामध्ये अजय देवगणची मुख्य भूमिका आहे.