शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “ग्रुपमध्ये मला शून्य किंमत आणि…”, डीपीची नाराजी, ग्रुपमध्ये राहणार नसल्याचंही अंकिताला सांगितलं, म्हणाला, “नीट उत्तरही…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Dhananjay expressed his wish that he will not part of team B with Ankita, Paddy, Abhijeet, Suraj and Varsha

Bigg Boss Marathi 5 मधील ‘ग्रुप बी’मध्ये पडणार फूट, डीपीदादांनी व्यक्त केली टीममध्ये न राहण्याची इच्छा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता दणक्यात सुरु झाला आहे. शो सुरु झाल्याच्या आधीच्या दिवसांत घरातील स्पर्धक छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी मात्र घरचं वातावरण बदललं आहे. त्यामुळे घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर व पॅडी कांबळे यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन्ही ग्रुपमध्ये घरातील वातावरण पूर्णत: बदललं असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

घरातील डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार त्याच्या खास अंदाजाने सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. घरात तणावाचं वातावरण असलं तर डीपी दादा त्यांच्या विनोदी शैलीने वातावरण मजेशीर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता त्यांचा हाच स्वभाव त्यांच्याच ग्रुपमधील काहींना आवडत नाहीये. याबद्दल डीपी यांच्या मनात खेद असून ही खेद त्यांनी घरातील अंकिताजवळ व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की जान्हवीला करतेय टार्गेट, घन:श्यामच्या खांद्यावर बंदूक ठेवून अभिजीतला घराबाहेर करण्याचं प्लॅनिंग अन्…

गेल्या काही दिवसांपासून डीपी वर्षा व काही सदस्यांवर नाराज आहेत आणि याचाच एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये डीपी अंकिताला असं म्हणतात की, “अति बोलल्याने आता माझी किंमत शून्य झाली आहे. माझ्या एकाही प्रश्नाचं ग्रुपमधून कधी नीट उत्तर मला मिळालेलं नाही”. यावर अंकिता त्यांना “तुम्हाला हा ग्रुप सोडायचा आहे का?” असं विचारते आणि यावर डीपीही “हो” असं उत्तर देतात. पॅडी याबद्दल पुढे असं म्हणतात की, “तुम्ही ग्रुपवर अविश्वास दाखवत आहात आणि नक्की काय चुकलं आहे?”. तर अंकिता डीपी यांची बाजू घेत असं म्हणते की “त्यांना या ग्रुपबद्दल जे काही वाटत आहे ते खूप चुकीचे आहे आणि यामुळे ग्रूपची समीकरणे बदलणार आहेत”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर

‘बिग बॉस मराठी’मध्ये नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील सूरज व धनंजय यांना नॉमिनेट केलं. यावेळी अंकिताने वर्षा यांनी धनंजय यांना त्यांच्या पूर्वीच्या रागामुळेच नॉमिनेट केलं असल्याचं म्हटलं. त्यांचा हाच राग आता बाहेर येताना दिसून येत आहे. त्यामुळे आता डीपी अंकिता, पॅडी, वर्षा व सूरज यांच्या ग्रुपमधून बाहेर पडणार का? त्यांचा या ग्रुपमधील सदस्यांवरील राग जाणार का? आणि या या ग्रुपनधील सदस्यांची समीकरणे नक्की कशी बदलणार? हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे      

Tags: ankita walawalkardhananjay powarPandharinath KambleSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
vishakha subhedar son education

Video : उच्चशिक्षणासाठी लंडनला गेला विशाखा सुभेदारांचा लेक, मिठी मारुन रडू लागल्या अन्…; म्हणाल्या, “स्वप्न पाहिलंस…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.