Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता दणक्यात सुरु झाला आहे. शो सुरु झाल्याच्या आधीच्या दिवसांत घरातील स्पर्धक छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी मात्र घरचं वातावरण बदललं आहे. त्यामुळे घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर व पॅडी कांबळे यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन्ही ग्रुपमध्ये घरातील वातावरण पूर्णत: बदललं असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
घरातील डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार त्याच्या खास अंदाजाने सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. घरात तणावाचं वातावरण असलं तर डीपी दादा त्यांच्या विनोदी शैलीने वातावरण मजेशीर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता त्यांचा हाच स्वभाव त्यांच्याच ग्रुपमधील काहींना आवडत नाहीये. याबद्दल डीपी यांच्या मनात खेद असून ही खेद त्यांनी घरातील अंकिताजवळ व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डीपी वर्षा व काही सदस्यांवर नाराज आहेत आणि याचाच एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये डीपी अंकिताला असं म्हणतात की, “अति बोलल्याने आता माझी किंमत शून्य झाली आहे. माझ्या एकाही प्रश्नाचं ग्रुपमधून कधी नीट उत्तर मला मिळालेलं नाही”. यावर अंकिता त्यांना “तुम्हाला हा ग्रुप सोडायचा आहे का?” असं विचारते आणि यावर डीपीही “हो” असं उत्तर देतात. पॅडी याबद्दल पुढे असं म्हणतात की, “तुम्ही ग्रुपवर अविश्वास दाखवत आहात आणि नक्की काय चुकलं आहे?”. तर अंकिता डीपी यांची बाजू घेत असं म्हणते की “त्यांना या ग्रुपबद्दल जे काही वाटत आहे ते खूप चुकीचे आहे आणि यामुळे ग्रूपची समीकरणे बदलणार आहेत”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर
‘बिग बॉस मराठी’मध्ये नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील सूरज व धनंजय यांना नॉमिनेट केलं. यावेळी अंकिताने वर्षा यांनी धनंजय यांना त्यांच्या पूर्वीच्या रागामुळेच नॉमिनेट केलं असल्याचं म्हटलं. त्यांचा हाच राग आता बाहेर येताना दिसून येत आहे. त्यामुळे आता डीपी अंकिता, पॅडी, वर्षा व सूरज यांच्या ग्रुपमधून बाहेर पडणार का? त्यांचा या ग्रुपमधील सदस्यांवरील राग जाणार का? आणि या या ग्रुपनधील सदस्यांची समीकरणे नक्की कशी बदलणार? हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे