Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. दोन्ही टीम एकमेकांमध्ये भिडल्या. गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. अशातच बुधवारच्या भागात बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसले. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला झाला. मात्र या टास्कचा एकही नियम सदस्यांकडून पाळला गेला नाही. यामुळे ‘बिग बॉस’ने शिक्षा म्हणून हा टास्कच रद्द केला. तसेच या टास्कमध्ये विजयी होणाऱ्या टीम किंवा टीममधील सदस्याला एक विशेषाधिकार देण्यात येणार होता. तोदेखील रद्द करण्यात आला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
परिणामे या घरात आता कॅप्टन्सीसाठी आज पुन्हा एकदा एक नवीन टास्क खेळला जाणार आहे आणि या नवीन टास्कचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्ववारे नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून बिग बॉस मराठीच्या घरचा नवीन कॅप्टन कोण होणार हे कळणार आहे. या नवीन टास्कमध्ये कॅप्टन्सी कंटेडरची बस निघणार असून यामुळे घराला एक नवीन कॅप्टन मिळणार आहे. यावेळी अंकिता गणपतीसाठी तिकीट कन्फर्म झाली असल्याचे सांगत बसमधून मला जाऊद्या असं पॅडी कांबळे यांना सांगते. तर पॅडी कांबळेदेखील तिला “मला जाऊदे” असं मिश्किल उत्तर देतात.
आणखी वाचा – 05 September Horoscope : गुरुवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे आणि तुमच्या नशिबात काय असेल?
पुढे अरबाज “मी घन:श्यामपेक्षा चांगली कॅप्टन्सी करु शकतो” असं म्हणताच अभिजीत घन:श्यामची बाजू घेत “का घन:श्याम कॅप्टन होऊ शकत नाही” असा प्रश्न उपस्थित करतो. यापुढे पॅडी घन:श्यामला “गुच्चा मारीन तुला” असं म्हणतात. यावर दुखावलेला घन:श्याम “आधीच जवळच्या लोकांनी गुच्चा मारलेला कमी आहे का?” असं म्हणतो. यावरुनच यंदाच्या कॅप्टन्सी टास्कमध्येही आपली माणसेच आपल्या माणसांना दुखावणार असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा – ‘किल’ ते ‘तणाव 2’, या विकेण्डला अनुभवा मनोरंजनाची मेजवानी, क्राइम व थ्रिलर चित्रपटांचा खजिना, जाणून घ्या
दरम्यान, वर्षा यांच्या नंतर आता घराला नवीन कॅप्टन कोण मिळणार? याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याआधी अंकिता, अरबाज, निक्की व आता वर्षा आदी सदस्य अनुक्रमे घरच्या कॅप्टन झाले आहेत. त्यामुळे आता या घरात नवीन कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. याशिवाय या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार हेदेखील पाहायला मिळणार आहे.