Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या सहावा आठवडा सुरू आहे. घरातील समीकरण पूर्णपणे बदलली आहेत. सुरुवातीपासून एकत्र खेळत असलेले सदस्य आता विरोधात खेळताना दिसत आहेत. यापैकी एक म्हणजे निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. सुरुवातीच्या दिवसांमध्ये निक्की व जान्हवी एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार होत्या. पण आता निक्की व जान्हवीमध्ये सतत वाद होताना पाहायला मिळत आहे. जान्हवी निक्की विरोधात जबरदस्त खेळताना दिसत आहे. अशातच आता निक्की नवीन टास्कमध्ये जान्हवीविरुद्ध नवीन कट रचणार असल्याचे दिसून येत आहे. आजच्या भागात निक्की जान्हवी व अभिजीतविरुद्ध नवीन प्लॅन करणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
गेले काही दिवसांपासून निक्की व जान्हवी यांची चांगली मैत्री होती. मात्र आता मैत्रीत दुरावा आला असून सख्ख्या मैत्रीणी आता एकमेकींच्या शत्रू झाल्यात की काय असं चित्र निर्माण झालं आहे., गेले अनेक दिवस या घरात निककी व जान्हवी यांच्यात छोट्या छोट्या कारणावरुन वाद होत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की घरातील कोणत्याही कामांना हात लावण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळालं. वर्षा यांची कॅप्टन्सी सुरु झाल्यापासून निक्कीने घरातील कामं करण्यास नकार दिला. यामुळे जान्हवीने निक्कीला जेवण देण्यास नकार दिला होता. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची होणार आहे. याचाच सूड निक्की जान्हवीवर काढणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या होणाऱ्या बस टास्कसाठी निक्की जान्हवीविरुद्ध प्लॅनिंग करताना पाहायला मिळणार आहे. यावेळी निक्की घन:श्यामला जान्हवीविरुद्ध असं म्हणते की, “‘बिग बॉस’ने दुसऱ्या फेरीत कुणी बाहेर जाणार असेल असं म्हटलं तर त्या फेरीत आपलं एकमेकांना बहुमत असेल. तर मी तुला बहुमत देईन. तर तू जान्हवीला बाहेर काढशील. तुझं जान्हवीबरोबर भांडण झालं होतं. त्यामुळे तू तिला नॉमिनेट कर. मी अभिजीतला नॉमिनेट करणार आहे. पण तू जान्हवीला काढणार असशील तरच मी तुला तिकीट मास्टर बनवणार आणि त्यासाठी माझं बहुमत तुला असेल”.
आणखी वाचा – 05 September Horoscope : गुरुवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे आणि तुमच्या नशिबात काय असेल?
दरम्यान, बुधवारच्या भागात BB फार्म या टास्कच्या सुरुवातीलाच शक्तीचं प्रदर्शन झाल्यामुळे पहिली फेरी रद्द करण्यात आली. तसंच ‘बिग बॉस’कडून एक शिक्षादेखील देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही चुकीचा गेम खेळला गेल्याने हा बिग बॉसने हा टास्कच रद्द केला. त्यामुळे आता या घरात नवीन कॅप्टन्सी टास्क पार पडणार असून या टास्कमध्ये आता कोण या घरचा नवीन कॅप्टन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.