बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. तर काही कलाकारांची मुलंही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच सिनेविश्वातील एका कलाकार जोडीच्या लेकानेही आई- वडिलांपाठोपाठ सिनेविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय याने देखील दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अभिनय या दिग्दर्शन क्षेत्रातील अभ्यासासाठी परदेशात शिकण्यास गेला असल्याचं समोर आलं आहे. लंडन येथे शिक्षणासाठी अभिनय गेला आहे. (vishakha subhedar son)
अभिनयला परदेशात जाताना निरोप देण्यासाठी आई-वडील, जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार विमानतळावर पोहोचले होते. विमातळावर सोडायला आल्यावर अभिनयला भेटतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. घरातून निघतानाही लेक दूर जाणार यामुळे विशाखाला अश्रू अनावर झालेले दिसले. अभिनयला त्याच्या आई-बाबांनी घट्ट मिठीही मारलेली दिसली. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या लेकासाठी विशाखाने खास पोस्ट लिहिली.
विशाखाने ही पोस्ट शेअर करत खास क्षण शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “आज आमचा अबू, अबुली पुढील शिक्षणासाठी लंडनला निघाला. M. A. In film making ( spl direction ) करायला Plymouth ( प्लायमाउथ ) शहरात जाणार आहे. अबू तू जी स्वप्न पाहिलीस ती पूर्ण होवोत. तू अतिशय मेहनती व झोकून देऊन काम पूर्ण करण्यामधील आहेस. आता ही जायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी तू सक्षमपणे पार पाडल्या आणि त्यासाठी आम्हाला मदत केली. नवी मुंबई, वाशी मधल्या wisdome career education या मंडळाने जातीने लक्ष घातलं. त्यांचे ही खूप खूप आभार”.
पुढे तिने म्हटलं की, “सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तुला plymouth युनिव्हर्सिटीकडून मिळालेली स्कॉलरशिप. तुझ्या कामाच्या अनुभवामुळे व इच्छा शक्तिमुळे तुला शिक्षणात ५०% सवलत मिळाली. कमाल. यापुढेही तिच मनिषा बाळग. दूरदेशी तू माणसं जोडशीलच कारण अतिशय लाघवी, गुणी स्वभावाचा तू आहेस. जां अबुली जी ले जिंदगी आणि खूप छान शिकून ये. तयारीचा गडी होऊनच ये. बाकी सगळं तुला तर माहित आहे. सगळं काही तुझ्याचसाठी. माझ्या समजूतदार हुशार बाळा. लव्ह यू अबुली. मी व बाबा तुला प्रचंड मिस करणार पण आई-बाबा तुझ्या स्वप्नांसाठी कायम तुझ्या पाठीशी उभे राहणार”, असं म्हणत त्याला पाठिंबा दर्शविला आहे.