शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi :  “तुला आताच मारेन”, वैभवची आर्याला धमकी, अंगावर ओरडत राहिला अन्…; हे वागणं शोभतं का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 21, 2024 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Vaibhav Chavan threatens to hit Aarya Jadhav know more

Bigg Boss Marathi 5 मध्ये वैभवकडून आर्याला कानाखाली मारण्याची धमकी, हे कितपत योग्य?, रितेशच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे गेले तीन आठवडे चांगलेच गाजले. हे तिन्हा आठवडे गाजवण्यात घरातील काही सदस्यांचा मोठा वाटा होता. निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव यांनी आतापर्यंत आरेरावी, धमकी, अंगावर धावून येणं, अपशब्द वापरणं असे अनेक प्रकार केले. कित्येकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने समजावूनही या सगळ्यांमध्ये अजूनही कोणताच फरक पडलेला दिसत नाही. वर्षा उसगांवकरांचा अपमान, त्यांच्या करिअरवर भाष्य केल्यानंतर निक्कीला रितेशने चांगली समज दिली होती. पण यानंतरही घरातील चित्र फारसं काही बदलेलं दिसत नाही. शिवाय वैभवला त्याचा गेम तसंच वागणं सुधारायला हवं असा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने आता रागाच्या भरात एक मोठी चूक केली आहे. (Bigg Boss Marathi Daily Update)

‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांना सत्याचा पंचनामा हा विशेष टास्क देण्यात आला होता. या टास्कदरम्यान वैभवला एका रुममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी “आपण आपल्या ग्रुपमधील सगळ्यात कमकुवत सदस्य आहात. खरं की खोटं?” असा प्रश्न ‘बिग बॉस’ने वैभवला विचारला. “हे खोटं आहे” असं वैभवने उत्तर दिलं. मात्र टीम बीला वैभवच्या उत्तराशी सहमत होणं गरजेचं होतं. तरच त्याला बीबी करन्सी मिळाली असती. पण टीम बीने त्याच्या मताशी सहमती दर्शवली नाही.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग, आताही तेच करतो”, पॅडीच्या अभिनयावरुन जान्हवीचं वक्तव्य, रागात काहीही बोलून गेली अन्…; प्रेक्षक व कलाकारांचा संताप

वैभव टास्क रुममधून बाहेर येताच त्याचा राग अनावर झाला. तो रागाच्या भरात काहीही बोलून गेला. “साले तुम्ही सगळे फट्टू आहात. माझ्या गेमवर बोलायचं नाही. तुम्हाला इथून पळवून नाही लावलं ना तर बघा”. हे सगळं सुरु असताना वैभव ओरडत पॅडीच्या अंगावर गेला आणि त्याने अपशब्दांचाही वापर केला. शिवाय टीम बीमधील सदस्यांना त्याने फालतू म्हटलं. यावर आर्याने बोलायला सुरुवात केली. तितक्यातच वैभवचा पारा आणखीनच चढला. त्याला त्याचंच भान राहिलं नाही.

आणखी वाचा – Badlapur Sexual Assault Case : “दोषींना महाराजांच्या काळातील चौरंग शिक्षा द्या…”, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुख भडकला, म्हणाला, “हा कायदा…”

वैभव ओरडत म्हणाला, “अरे ए शांत बस्स. तुला बोललो नाही मी. तुला तर असे झापडेन ना आता (कानाखाली किंवा मारेन असा याचा अर्थ होता) तुला इज्जत आहे आम्हाला मुलांना इज्जत नाही का? तुझ्यासारखा मी घाणेरडा नाही. तुम्हा सगळ्यांना मस्ती आली आहे”. टीम एने फक्त इतर सदस्यांना धमक्या दिल्या. शिवाय शिव्या देणंही सोडलं नाही. वैभवने तर आर्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय लज्जास्पद होतं. आता रितेश यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: Aarya Jadhavbigg boss marathi 5Vaibhav Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
suruchi adarkar first manglagaur

सुरुची अडारकराची लग्नानंतरीच पहिली मंगळागौर, नटून-थटून नवऱ्यानेही दिली साथ, साधेपणाचं होत आहे सर्वत्र कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.