Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात नुकताच घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस’कडून ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाली. ग्रुप A मध्येही आपआपसात वाद झाले. तर, दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पु्न्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. याआधी निक्की वर्षाताईंना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल भाष्य केलं होतं. आशातच जान्हवीनची जीभही घसरली आहे. नुकत्याच झालेल्या भागात जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे. जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांना ‘जोकर’, ‘विदुषक’ म्हणत ‘त्यांनी आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग केली”. असं वक्तव्य केलं आहे. (BiggBoss Marathi 5 Daily Update)
‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर अपमानास्पद वक्तव्य केले. आपल्या ग्रुपचा डाव समोरची टीम उधळून लावत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रुप Aमध्ये चलबिचल सुरु झाली. यामुळे त्या टीममधील सदस्यांमध्येच खटकेही उडू लागले होते. यावेळी टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”.
पॅडी कांबळेंच्या करिअरवर भाष्य केल्यानंतर आर्या जाधव ही गार्डन एरियामध्ये बसलेल्या जान्हवीला जाब विचारते. त्यावर जान्हवीही तिला “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असे म्हणते. यावर आर्या तिला “तू जेवढं काम केलं नाहीये तेवढी त्यांनी अॅक्टिंग केली आहे. त्यांचा एक स्टेटस आहे. त्यांनी खूप काम केलं आहे. त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही” असं म्हणते. पण, जान्हवी तिच्याकडे कुत्सितपणे पाहते आणि “जा तुझ्या गँगला घेऊन ये” असे म्हणते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजवर कॅप्टन्सीची टांगती तलवार, स्वत:चा फायदा बघणार की घराचा?, निर्णय ठरणार लक्षवेधी
जान्हवीच्या या वक्तव्यानंतर पॅडीच्या अनेक चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. तसंच तिने वक्तव्य हे अपमानास्पद आहे असं म्हणत आहे. अनेक कलाकार मंडळींकडूनही जान्हवीच्या व्यक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला जाता आहे. वीकेंडला होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’ कार्यक्रमात होस्ट रितेश देशमुखने याआधी जान्हवीला तिच्या वागण्याबाबत आणि इतरांना अपमानास्पद बोलण्याबाबत खडे बोल सुनावले होते. कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने स्पष्ट केले होते. त्यानंतरही जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या करिअरवर भाष्य केले. त्यामुळे आता रितेश जान्हवीच्या व्यक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ नेमकं काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.